शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक शिक्षक समितीचा तालुकास्तरीय मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 21:24 IST

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सालेकसाच्या वतीने महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या तालुकास्तरीय मेळाव्यात तालुक्यातून जाणाऱ्या व तालुक्यात येणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देशिक्षकांच्या समस्यांवर चर्चा : समितीने केला शिक्षकांचा सत्कार, मान्यवरांची उपस्थिती
<p>लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सालेकसाच्या वतीने महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या तालुकास्तरीय मेळाव्यात तालुक्यातून जाणाऱ्या व तालुक्यात येणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची स्थापना २२ जुलै १९६२ रोजी झाली. शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्याचे काम शिक्षक समितीच्या माध्यमातून करण्यात आले. तालुका ते राज्यस्तरावरुन विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या समस्या सोडविण्याचे काम अविरतपणे शिक्षक समिती करीत आली आहे. न्यायाची चाल आणि अन्यायाचा विरोध करणारी राज्यातली मोठी संघटना समिती आहे.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सालेकसाचे माजी व आमगावचे गटशिक्षणाधिकारी वाय.सी. भोयर होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष मनोज दीक्षित, जिल्हा सरचिटणीस एल.यू. खोब्रागडे, राज्य कार्यकारिणी सदस्य तथा संचालक किशोर डोंगरवार, उपाध्यक्ष विनोद बडोले, संचालक एन.बी. बिसेन, संदीप तिडके, शिक्षण विस्तार अधिकारी एन.पी. चिखलोंढे, भंडाराचे उपाध्यक्ष सुरेश कश्यप, राज्य संघटक व्ही.जी. राठोड, केंद्रप्रमुख एच.पी. पटले, डी.एल. गुप्ता, एस.सी. पारधी, संदीप मेश्राम, अनिल टेंभुर्णीकर, दीपक कावसे, आर.वाय. मस्करे उपस्थित होते.सत्कारमूर्ती म्हणून संघातून समितीमध्ये प्रवेश केलेले माजी संचालक एस.जे. जोगी, तालुक्यात येणारे सहायक शिक्षक दिलीप नवखरे, पठाण, के.एन. किरसान, एस.बी. रहांगडाले, फरदे, राजेश जैन, बोपचे, उर्मिला मरकाम उपस्थित होते. शिक्षकांना मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष मनोज दीक्षित म्हणाले, शिक्षक समितीच्या माध्यमातून आम्ही शिक्षकांच्या समस्या तालुका ते राज्यस्तरापर्यंत सोडविण्याचे कार्य करीत आहोत. आपल्या जिल्ह्यात शिक्षक समिती ही मोठी संघटना म्हणून ओळखली जाते. या समितीमध्ये सर्व कार्यकर्ते आक्रमक भूमिका घेवून शिक्षकांच्या समस्या सोडविण्यास समर्थ आहेत.या प्रसंगी तालुका कार्याध्यक्ष टी.आर. लिल्हारे, जिल्हा सरचिटणीस एल.यू. खोब्रागडे, राज्य कार्यकारिणी सदस्य किशोर डोंगरवार, विनोद बडोले, संचालक संदीप तिडके, एन.बी. बिसेन, कर्मचारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष सुरेश कश्यप, केंद्र प्रमुख डी.एल. गुप्ता, माजी संचालक एस.जे. जोगी, राजेश जैना, जयेश लिल्हारे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच सत्कारमूर्तींना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यात शिक्षकांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. मेळाव्यात गोंदिया, देवरी, आमगाव, सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी येथील शिक्षक सहभागी झाले होते.अध्यक्षीय भाषणातून गटशिक्षणाधिकारी वाय.सी.भोयर म्हणाले, शिक्षक, अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यात समन्वय असले पाहिजे. त्यामुळे समस्या सोडविण्यास मदत होईल. आम्ही अधिकारी पण समस्या सोडविण्यासाठी सदैव प्रयत्न करतो आणि शिक्षकांचे हिताचे काम करतो, असे ते म्हणाले.प्रास्ताविक शिक्षक समिती अध्यक्ष एस.बी. दमाहे यांनी मांडले. संचालन पी.बी. लांजेवार यांनी केले. आभार राजकुमार बसोने यांनी मानले. कार्यक्रमासाठी कार्याध्यक्ष टी.आर. लिल्हारे, उपाध्यक्ष ओ.एच. लिल्हारे, आर.एस. वानखेडे, झेड.बी. उके, डी.बी. बरैया, जयेश लिल्हारे, एस.पी. बैठवार, पी.एम. ढेकवार, आर.सी. नागपुरे, बी.के. मोहबे, आर.एस. बसोने, प्रकाश चौधरी, डी.एस. कुराहे, के.झेड. लिल्हारे, आर.जी. नागपुरे, कबिर माहुले, महिला प्रतिनिधी अनिता बोरकर, ए.बी. बोरकर, दिलीप कुहटकर, डी.बी. दहीलकर, उमेश नागपुरे, पी.पी. नागपुरे, फरदे, मेहरचंद बैठवार, पारधी, टी.एन. बैठवार, डी.एन. गोलीवार, चव्हाण, एस.डी. रहांगडाले, एम. पी. म्याकलवार, एम.पी. माहुले यांनी सहकार्य केले.