शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

गाडी चालविताना मोबाइलवर बोलणारेच ठरताहेत अपघातांना कारणीभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:30 IST

गोंदिया : सध्या मोबाइल हा जीवनातील अविभाज्य अंग बनला असून सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मोबाइल हातातून सुटेनासा झाला आहे. ...

गोंदिया : सध्या मोबाइल हा जीवनातील अविभाज्य अंग बनला असून सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मोबाइल हातातून सुटेनासा झाला आहे. मोबाइलचा हा अति वापर मात्र गाडी चालविताना जीवघेणा ठरत आहे. यामध्ये मोबाइलवर बोलणाऱ्यामुळे मात्र समोरच्या व्यक्तीलाही त्याची किंमत मोजावी लागत आहे. मोबाइलवर बोलून गाडी चालवीत असल्यामुळे कित्येक अपघात घडत असून यामध्ये जीवही जात आहे.

--------------------------------

१) २०२० मध्ये झालेले अपघात

अपघात जखमी मृत्यू

दुचाकी - १०६ ९१ ६९

चारचाकी - ८४ १२० ५२

२) या वर्षात केलेला दंड

प्रकरणे दंड

वाहन चालविताना मोबाइलचा वापर - -- --

विना हेल्मेट - ६७ ३३५००

सिग्नल तोडणे - १८२ ३६४००

प्रेशर हॉर्न - -- --

ओव्हरलोड - -- --

वायू प्रदूषण - -- --

-----------------------------

हेल्मेट नसल्याने ९० टक्के मृत्यू

सर्वांत जास्त अपघातांचे प्रमाण दुचाकी वाहनांचे असून यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांचा जीव जातो. विशेष म्हणजे, जिल्ह्यात घडलेल्या अपघाती मृत्यूंच्या प्रकरणांचा अभ्यास केला असता त्यामध्ये ८५ ते ९० टक्के लोकांचा जीव हेल्मेट नसल्यामुळे गेल्याचे निष्पन्न झाले आहे. शहरातील कोणत्याही भागावर जखम झाल्यास व्यक्तीचा जीव वाचविता येतो. मात्र, डोक्यावर मार लागल्यावर त्याचे प्रमाण कमी असते, अशाच अपघाती मृत्यूंचे प्रमाण जास्त असल्याचे वाहतूक निरीक्षक दिनेश तायडे यांनी सांगितले.

---------------------------

कोरोनामुळे ब्रेथ ॲनालायझरचा वापर बंद

मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. अशात ब्रेथ ॲनालायझरचा वापर बंद करावा लागला आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार असून ब्रेथ ॲनालायझरमध्ये फुंकर मारूनच समोरच्या व्यक्तीने मद्यप्राशन केले की नाही, हे तपासले जाते. हा प्रकार कोरोना संसर्ग पसरविणारा ठरू शकत असल्याने ब्रेथ ॲनालायझरचा वापर बंद आहे.