सडक अर्जुनी : काही दिवसानंतर नगर पंचायतच्या निवडणुका लागतील. त्या दृष्टीने आपला पक्ष मजबूत असला पाहिजे. त्या करिता प्रत्येक वाॅर्डामध्ये बूथ कमिट्या तयार करा आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चला, अशा सूचना माजी आ. राजेंद्र जैन यांनी पक्षाच्या आढावा बैठकीत दिल्या.
तेजस्विनी लॉन सडक अर्जुनी येथे सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आ. मनोहर चंद्रिकापुुरे, जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर उपस्थित होते. सडक अर्जुनी नगर पंचायतच्या १७ वॉर्डामधील पक्षाचा आढावा त्यांनी जाणून घेतला व त्यावर मार्गदर्शन केले. बैठकीला विशाल शेेंडे, प्रभाकर दोनोडे, माजी जि.प. सदस्य रमेश चुऱ्हे, माजी नगराध्यक्ष देवचंद तरोणे, माजी जि.प. सदस्य मिलन राऊत, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष डॉ. अविनाश काशिवार, महिला तालुका अध्यक्ष रजनी गिऱ्हेपुंजे, भृगंराज परशुरामकर, टी.के. मडावी, माजी नगराध्यक्ष शशिकला टेंभुर्णे, एफआरटी शहा, अतुल फुले, माजी पं.स. सभापती वंदना डोंगरवार, मुस्लीम कमिटीचे तालुकाध्यक्ष मतीन शेख, मोहन शर्मा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आनंद अग्रवाल, शहर अध्यक्ष प्रियंक उजवने, दिलीप गभणे, विद्यार्थी प्रमुख आशिष येरणे, फारुक शेख,ओमप्रकाश टेंभुर्णे, सुबुर सौदागर, बंटी सयाम, पुष्पा गुप्ता, प्रमिला बडवाईक, दीक्षा भगत, जया मसराम, शाहिस्ता शेख, कामिनी कोवे उपस्थित होते.