शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

वर्तमान स्थिती बघून उपाययोजना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:37 IST

जिल्ह्यात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर होत असूनही जिल्हा प्रशासन याबाबतीत गंभीर नाही. पालकमत्र्यांनीही बैठक घेऊन आढावा घेतलेला नाही. त्यात राज्य सरकार भविष्यातील योजनांवर बोलत आहे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : पाणी टंचाईवर विधानसभेत गरजले

ऑनलाईन लोकमतगोंदिया : जिल्ह्यात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर होत असूनही जिल्हा प्रशासन याबाबतीत गंभीर नाही. पालकमत्र्यांनीही बैठक घेऊन आढावा घेतलेला नाही. त्यात राज्य सरकार भविष्यातील योजनांवर बोलत आहे. त्यामुळे राज्य सरकारने वर्तमान स्थितीतील गंभीर परिस्थितीवर उपायोजना करावी अशी मागणी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केली.जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या गंभीर विषयावर लक्षवेधी सुचनेच्या माध्यमातून आमदार अग्रवाल यांनी सरकारचे लक्ष केंद्रीत केले. यावर विधानसभेत बोलताना आमदार अग्रवाल यांनी, जिल्ह्यात यंदा ४२ टक्के पाऊस कमी पडला असून सरकारने आधीच तीन तालुके मध्यम दुष्काळग्रस्त घोषीत केले आहे. भुगर्भातील पाण्याची पातळीही १० फुट खालावली असून येत्या २-३ महिन्यांत स्थिती अधिकच गंभीर होणार आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने यावर काहीच उपाययोजना केलेली नाही. पालकमंत्र्यांनी बैठक घेऊन जिल्हा प्रशासन काय तयारी करीत आहे यासाठी बैठक घेतलेली नसल्याचे सांगितले.यावर राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आमदार अग्रवाल यांचे म्हणणे योग्य असल्याचे सांगत जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत ४० योजनांना मंजुरी दिल्याचे सांगीतले. तसेच १२६ लाख रूपयातून ३० विंधन विहिरींची दुरूस्ती १८ नवीन विंधन विहीरी, विहीरींचे खोलीकरण व इनवेल बोअर आदि कार्य केले जाणार असल्याचे सांगीतले. मात्र नामदार लोणीकर यांच्या उत्तरावर आमदार अग्रवाल अधिकच संतापले. त्यांनी येत्या २-३ महिन्यात गंभीर पाणी टंचाई होणार असून सरकारने मंजूर केलेल्या ४० योजना या दरम्यान पूर्ण होणार नाहीत. त्यामुळे भविष्यातील योजनांबद्दल न बोलता वर्तमान स्थितीशी निपटण्यासाठी उपाययोजना करावी असे ठणकावले.४० हजार लोकांना पाणी पुरवठा करू शकणारी फुलचूर-फुलचूरपेठ-मुर्री-कारंजा-पिंडकेपार योजना सरकार लालफीतशाहीत अडकून पडली. आता फक्त गोंदिया तालुक्यात सुमारे ३०० नवीन विंधनविहीरी, ६४ नळ योजनांची दुरूस्ती, ८२७ विंधनविहीरींची दुरूस्ती, २८४ विहिरींचे खोलीकरण व इनवेल बोअर तसेच १४० जलभंजन करण्याची गरज आहे. अशात मात्र राज्य सरकार जिल्ह्यात उपाययोजनेसाठी १२६ लाख रूपये खर्च करून स्वत:ची पाठ धोपटून घेत असल्याचे म्हटले. तीन तालुक्यांत दुष्काळ घोषीत असूनही चार महिन्यांत संबंधीत अधिकाऱ्यांनी काहीच उपाययोजना केली नाही. किमान ज्या योजनांचे वीज बिल थक ल्यामुळे कनेक्शन कापण्यात आले आहेत, त्यांची जोडणी करण्याची मागणी आमदार अग्रवाल यांनी केली.संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईपाणी टंचाईच्या विषयावर आमदार अग्रवाल यांनी विधानसभा गाजवून सोडली असता नामदार लोणीकर यांनी वेळीच उपाययोजना न करणाºया व पाणी टंचाईच्या गंभीर विषयावर निष्काळजीपणा करणाºया संबंधीत अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे सांगीतले. तसेच पाणी टंचाईशी निपटण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जाणार असल्याचेही सांगितले.