शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणकारी योजनांचा लाभ घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 20:59 IST

अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत राज्यात दुसऱ्या टप्प्यात गोंदिया जिल्ह्याचा समावेश करण्यात आला. कामगारांच्या जीवनात उद्याचा आनंद निर्माण करण्यासाठी, त्यांच्या कष्टाचा सन्मान करण्यासाठी बांधकाम व इतर बांधकाम क्षेत्रात कष्ट उपसणाऱ्या कामगारांसाठी शासनाने सुरू केलेली ही योजना लाभदायक आहे.

ठळक मुद्देराजकुमार बडोले : अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत नोंदणी अभियान सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत राज्यात दुसऱ्या टप्प्यात गोंदिया जिल्ह्याचा समावेश करण्यात आला. कामगारांच्या जीवनात उद्याचा आनंद निर्माण करण्यासाठी, त्यांच्या कष्टाचा सन्मान करण्यासाठी बांधकाम व इतर बांधकाम क्षेत्रात कष्ट उपसणाऱ्या कामगारांसाठी शासनाने सुरू केलेली ही योजना लाभदायक आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील या क्षेत्राशी संबंधित कामगारांनी आपली नोंदणी या विशेष अभियानात करून घ्यावी. नोंदणीकृत कामगारांनी या योजनेसह विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.पंचायत समिती अर्जुनी-मोरगाव व कामगार कल्याण मंडळ कामगार विभाग गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १० ठिकाणी २३ जुलै ते ३ आॅगस्टपर्यंत बांधकाम व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी विशेष नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाची सुरूवात सोमवारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपयार्ड नवेगावबांध येथे करण्यात आले. याप्रसंगी ते अध्यक्षीय भाषणातून बोलत होते.याप्रसंगी प्रामुख्याने पं.स. सभापती अरविंद शिवणकर, जि.प. सदस्य रचना गहाणे, सरपंच अनिरुद्ध शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार, पं.स. सदस्य होमराज कोरेटी, विजया कापगते, केवलराम पुस्तोडे, अण्णा डोंगरवार, कान्होलीचे सरपंच संजय खरवडे, विजय अरोरा, उमाकांत ढेंगे, मसराम, हरिशचंद्र उईके, तहसीलदार धनंजय देशमुख, प्रभारी उपविभागीय अधिकारी कोरूडे, पालकमंत्र्यांचे स्वीय सहायक समीर बन्सोड, कृउबासचे सभापती कासिम जमा कुरेशी उपस्थित होते.या वेळी कृउबासचे सभापती कुरेशी हे हज यात्रेला जाणार आहेत, त्याबद्दल पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. प्रास्ताविक खंड विकास अधिकारी नारायण जमईवार यांनी मांडले. संचालन विस्तार अधिकारी अनूपकुमार भावे यांनी केले. आभार अशोक परशुरामकर यांनी मानले. कार्यक्रमात कामगार व गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते.पॉलिथीनबंदीचा अधिकाऱ्यांना विसरपालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात पॉलिथीनचा सर्रास वापर करण्यात आला. राज्यात पॉलिथीनबंदी झाली आहे. याचा जणू विसरच अधिकाऱ्यांना पडला होता. पॉलिथीनचे वेस्टन लावलेल्या पुष्पगुच्छांचा वापर स्वागत करताना करण्यात आला, अशी कुजबूज उपस्थितांमध्ये होती.

टॅग्स :Rajkumar Badoleराजकुमार बडोले