शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

विमा योजनेचा लाभ घ्यावा

By admin | Updated: July 24, 2016 00:03 IST

प्रधानमंत्री पीक विमा योजना पिकाशी निगडित विविध जोखीमेमुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या पिकांच्या नुकसानापासून संरक्षण देण्याचे एक माध्यम आहे.

धनराज तुमडाम : शेतकऱ्यांना केले आवाहन बोंडगावदेवी : प्रधानमंत्री पीक विमा योजना पिकाशी निगडित विविध जोखीमेमुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या पिकांच्या नुकसानापासून संरक्षण देण्याचे एक माध्यम आहे. नैसर्गिक आपत्ती व इतर कारणांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई पीक विमा योजनेद्वारे करता येते. नव्याने प्रथमच अंमलात आणलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी ३१ जुलै पर्यंत पीक विमा प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम यांनी केले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०१६ साठी भात, सोयाबीन, तुर, कापूस, ज्वारी, भुईमुंग, तीळ, मुंग व उडीद या पिकासाठी राबविण्यात येत आहे. योजनेचे वैशिष्ट्य नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा योजनेद्वारे संरक्षण मिळते. यामध्ये कर्जदार शेतकऱ्यांना पिक कर्ज मजंूर कालावधी १ एप्रिल ते ३१ जुलै २०१६ बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. खातेदाराव्यतिरिक्त कुळाने किंवा भाडेपटीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेऊ शकतात. विमा हप्ता खरीप हंगामासाठी २ टक्के व नगदी पिकासाठी ५ टक्के आहे. जोखीमस्तर सर्व पिकांसाठी ७० टक्के ठेवण्यात आला आहे. उंबरठा उत्पन्न हे मागील ७ वर्षाचे सरासरी उत्पन्न गुणिले त्या पिकाचा जोखीमस्तर विचारात घेवून निश्चित केले जाणार आकहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत जोखीमची व्याप्ती वाढविण्यात आली असून संरक्षणाच्या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. संरक्षणाच्या बाबी - प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पीक पेरणी पासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट जसे नसैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी पासून पिकांची नुकसान झाल्यास विम्याचा लाभ मिळू शकतो. पीक पेरणी पूर्व तसेच लावणी पूर्व नुकसान झाल्यास विम्याचा लाभ मिळू शकतो. पीक पेरणीपूर्व तसेच लावणीपूर्व नुकसान यात अपुरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे मुख्य पिकांची व्यापक प्रमाणावर पेरणी, लावणी न झालेल्या क्षेत्रासाठी विमा संरक्षण देय राहील. पुर पावसामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पन्नामध्ये उंबरठा उत्पन्नाच्या ८० टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर विमा संरक्षण देय राहील. शेतात कापणी करुन वाळविण्यासाठी पडलेल्या पिकास कापणी पासून जास्तीत जास्त १४ दिवस नैसर्गिकरित्या नुकसान झाल्यास वैयक्तिकरित्या पंचनामे करुन नुकसान भरपाई दिली जाणार आहे. पुराचे पाणी शेतात शिरुन पिकाचे झालेले नुकसान, भुस्खलन व गारपीट तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकाच्या नुकसानीस भरपाई वैयक्तिस्तरावर दिली जाणार. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी सर्व्हेनंबर नुसार बाधीत पीक व बाधीत क्षेत्राबाबत घटना घडल्यास ४८ तासाच्या आत याबाबतची सुचना विमा कंपनी, संबंधीत बँक, कृषी व महसूल विभागास कळविणे बंधनकारक आहे. पिकांच्या नुकसानीचा लाभ मिळावा यासाठी प्रधानमंत्री विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी तुमडाम यांनी केले आहे.