लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : तालुक्यातील ग्राम मोहाडी येथील सरपंच रजनी धपाडे व त्यांचे पती अरविंद धपाडे यांनी ५ वर्षांपुर्वी शासकीय तलावाच्या जमिनीत अतिक्रमण करुन पक्के शौचालय व आवारभिंत बांधकाम केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी त्यांनी तलावाच्या जमिनीत बाहेरु न माती आणून सपाटीकरण सुरू केले आहे. अशा बेजबाबदार सरपंच त्यांच्या पतीवर कारवाई करण्यात यावी अशी ऑनलाईन तक्रार गावकऱ्यांनी तहसीलदारांकडे सोमवारी (दि.२५) केली आहे.तक्रारीनुसार, ग्राम मोहाडी येथे गट क्रमांक १२५, आराजी २.१२ हेक्टर आरक्षेत्राचे शासकीय तलाव आहे. या तलावातील पाण्यापासून खरीप भात पिकाकरीता ५० एकर शेत जमिनीला पाणी पुरवठा होतो. अशा शासकीय तलावाच्या जमिनीत सरपंच रजनी धपाडे व त्यांचे पती अरविंद धपाडे यांनी ५ वर्षांपूर्वी अतिक्रमण करुन आवारभिंत व शौचालय बांधकाम केल्याचा आरोप आहे. आता विना परवाना बाहेरुन माती खोदकाम करुन आवारभिंत लगतच्या जमिनीचे सपाटीकरण करीत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या तलावातून आता शेत जमिनीला पुरेसे पाणी मिळणार नाही व शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. गावच्या प्रथम नागरिकाने अतिक्रमण करणे म्हणजे ग्रामपंचायत नियमांची पायमल्ली करण्याचे काम आहे. तलावाच्या जमिनीत अतिक्र मणाची चौकशी करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी धुर्वराज पटले, जागेश्वर पटले, परमानंद तिरेले, यादोराव पटले, श्रीराम पारधी, संजय पारधी, योगेश्वर पटले, देवचंद पटले, महेश बिसेन यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी व महसूल विभागाच्या प्रधान सचिवांकडे तक्रार करून केली आहे.गावात राजकारण केले जात आहे. शौचालय इमारत व आवारभिंत बांधकाम १५ वर्षांपूर्वीचे आहे. माती खोदकाम करु न तलावात सपाटीकरण केले जात नाही. ती माती दिराच्या घरी बांधकाम सुरू असलेल्या जागेची आहे. सर्व आरोप निर्धार आहेत.- रजनी धपाडे, सरपंच मोहाडी
तलावाच्या जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यावर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 05:00 IST
तक्रारीनुसार, ग्राम मोहाडी येथे गट क्रमांक १२५, आराजी २.१२ हेक्टर आरक्षेत्राचे शासकीय तलाव आहे. या तलावातील पाण्यापासून खरीप भात पिकाकरीता ५० एकर शेत जमिनीला पाणी पुरवठा होतो. अशा शासकीय तलावाच्या जमिनीत सरपंच रजनी धपाडे व त्यांचे पती अरविंद धपाडे यांनी ५ वर्षांपूर्वी अतिक्रमण करुन आवारभिंत व शौचालय बांधकाम केल्याचा आरोप आहे.
तलावाच्या जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यावर कारवाई करा
ठळक मुद्देमोहाडी येथील प्रकार : गावकऱ्यांनी केली तहसीलदारांना तक्रार