शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
3
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
4
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
5
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
6
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
7
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
8
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
9
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
10
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
11
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
12
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
13
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
14
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
15
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
16
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
17
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
18
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
19
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
20
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!

मिठाई व गुपचूपने ३४६ जणांना बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2016 02:03 IST

येथील मंडई प्रसिद्ध असून त्यात विविध कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी परिसरातील जनसमुदाय एकत्रित येतो.

 ककोडीच्या मंडईतील प्रकार : वैद्यकीय चमूच्या सहकार्याने परिस्थिती नियंत्रणातककोडी : येथील मंडई प्रसिद्ध असून त्यात विविध कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी परिसरातील जनसमुदाय एकत्रित येतो. मंगळवारी १५ मार्च रोजी भरलेल्या मंडईत दुकानांमधील मिठाई व गुपचूपच्या सेवनाने तब्बल ३४६ नागरिकांची प्रकृती बिघडली. त्यांना ककोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून उपचार करण्यात आल्या. वेळीच उपचार मिळाल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. ककोडी येथील मंडईत महाराष्ट्रासह छत्तीसगड येथील दुकाने लागले होते. यात २५ ते ३० मिठाईची दुकाने व तीन ते चार गुपचूपचे ठेले होते. रात्रभर विविध कार्यक्रम सुरू असल्याने नागरिक व पाहुणे मंडळींना रात्रभराचे जागरण झाले होते. शिवाय वातावरणातील बदल हासुद्धा नागरिकांची प्रकृती बिघडण्यास एक कारण ठरला. मंगळवारी मंडईनिमित्त आलेल्या पाहुणे मंडळी व गावकऱ्यांनी मिठाई व गुपचूप सेवन केल्यापासून त्यांना तीव्र ताप, शौच, उलट्या व पोटदुखीचा त्रास सुरू झाला. यात लहान मुले-मुली, तरूण-तरूणींचाही समावेश आहे.सदर आजार आटोक्यात आला असून गुरूवारच्या सायंकाळपर्यंत ककोडी प्राथमिक आरोग्य केंद्रात केवळ तीन ते चार रूग्ण शिल्लक असल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)खासगी डॉक्टर व पदाधिकाऱ्यांची मदतबुधवारी रात्री तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हुमणे यांनी ग्रामीण रूग्णालय चिचगड येथील वैद्यकीय चमूसह ककोडी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. गुरूवारी सकाळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरीश कळमकर यांनी भेट देवून प्रकरणाची शहानिशा केली. याप्रसंगी गावातील खासगी डॉक्टरांनीही मोलाची मदत करून सदर आजार आटोक्यात आणण्यासाठी सहकार्य केले. सरपंच रियाज खान, पंचायत समिती सदस्य गणेश सोनबोईर, चैनसिंग मडावी, कोटवार यांनी रूग्णांना रूग्णालयात पोहोचविण्यासाठी मदत केली. दोन-तीन तासात सुटीबुधवार व गुरूवारी या दोन्ही दिवशी तब्बल ३४६ रूग्णांवर ककोडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. हे रूग्ण चिल्हाटी, ककोडी, धवलखेडी, गणूटोला, मूरमाडी, तुंबीकसा येथील रहिवासी आहेत. जागेअभावी प्रत्येक रूग्णास जवळपास दोन ते तीन तास उपचार करून नंतर सुटी देण्यात येत होती. वैद्यकीय अधिकारी जी.एस.काळे यांनी रूग्णांना ने-आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करून दिल्याने मोठे सहकार्य मिळाले. जनचर्चेनुसार मिठाई व गुपचूपच्या सेवनानेच मंडईतील लोकांना प्रकृती बिघडल्याचे सांगितले जात आहे.