शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कामगार ‘ऑन ड्यूटी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 05:00 IST

झपाट्याने पसरत असलेल्या कोरोनावर मात करण्यासाठी भारतात ‘लॉकडाऊन’ करण्यात आले असून नागरिकांना घराबाहेर निघण्यास मनाई आहे. विशेष म्हणजे, कोरोनाने समस्या निर्माण केली असतानाच कधी नव्हे ते या कोरोना काळात घडत असल्याचे दिसत आहे. कोरोनाच्या या लढाईत आरोग्य व पोलीस विभागाला ‘सॅल्यूट’ या शिवाय अन्य काहीही प्रतिक्रीया देता येणार नाहीत.

ठळक मुद्देसुरू झाली मान्सूनपूर्व सफाई : नगरसेवक लागले कामाला, न.प.ची उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ‘लॉकडाऊन’मुळे बहुतांश नागरिक घराबाहेर निघणे टाळत असून अवघ्या देशातच हे चित्र बघावयास मिळत आहे. यात आरोग्य व पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असतानाच सफाई कामगारही आपले काम तत्परतेने बजावत असल्याचे शहरात दिसून येत आहे. कोरोनाला हरविण्यासाठी सर्वांचेच प्रयत्न सुरू असतानाच आपला परिसर स्वच्छ ठेवून त्यात हातभार लावण्यासाठी सफाई कर्मचारी आता मान्सूनपूर्व सफाईच्या कामाला लागल्याचे दिसत आहे. नगरसेवकांनी यासाठी पुढाकार घेतलचे चित्र आहे. पावसाळ्यातील स्थिती लक्षात घेता ते आपापल्या प्रभागांत स्वच्छतेची कामे करवून घेताना दिसत आहे.कोरोनाचा आज अवघ्या जगानेच धसका घेतला आहे. झपाट्याने पसरत असलेल्या कोरोनावर मात करण्यासाठी भारतात ‘लॉकडाऊन’ करण्यात आले असून नागरिकांना घराबाहेर निघण्यास मनाई आहे. विशेष म्हणजे, कोरोनाने समस्या निर्माण केली असतानाच कधी नव्हे ते या कोरोना काळात घडत असल्याचे दिसत आहे. कोरोनाच्या या लढाईत आरोग्य व पोलीस विभागाला ‘सॅल्यूट’ या शिवाय अन्य काहीही प्रतिक्रीया देता येणार नाहीत. मात्र त्यांच्याच बरोबरीने आज समाजातील उपेक्षीत घटकातील सफाई कामगार सुद्धा ‘ऑन ड्यूटी’ आहे.घराघरांतील कचऱ्याचे संकलन करण्यासाठी सकाळपासूनच कामावर लागणाऱ्या सफाई कामगारांनी आता शहर स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे. कोरोनाला मात देण्यासाठी वैयक्तीक स्वच्छता जेवढी महत्त्वाची आहे तेवढाच आपला परिसरही स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. यामुळेच नगरसेवक आता कामाला लागले असून नागरिकांनी वर्दळ नसल्याने त्यांनी मान्सूनपूर्व स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरूवात केली आहे. यासाठी सफाई कामगारांकडून नाल्यांतील गाळ उपसून स्वच्छता केली जात आहे. विशेष म्हणजे, आजची ही स्वच्छता पावसाळ््यात शहरात समस्या उद्भवू देणार नाही.सफाई कामगारांचे होत आहे कौतुककोरोनाच्या या लढाईत सर्वांनाच आज आपला जिव प्रिय असल्याचे दिसत आहे. अशात मात्र जनतेच्या जीवासाठी आरोग्य व पोलीस कर्मचारी आपला जीव धोक्यात घालत आहेत. त्यांना साथ देत सफाई कामगारही आपले कर्तव्य बजावत असून सेवा देत आहेत. त्यामुळे आरोग्य व पोलीस विभागाचे कौतुक करावे तेवढेकमी असतानाच सफाई कामगारांचेही कौतुक केले जात आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान