शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
4
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
5
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
6
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
7
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
8
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
9
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
10
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
11
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
12
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
13
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
14
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
15
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
16
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
17
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
18
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
19
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
20
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!

स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाला लोकसहभागासोबत राजाश्रयाचीही गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 20:53 IST

स्वदेळी खेळोत्तेजक मंडळाचा इतिहास जुना असून या मंडळाची स्थापना ८० वर्षांपूर्वी संयुक्त जिल्हा असलेल्या काळाची आहे. या मंडळाच्या माध्यमातून स्वदेशी खेळ दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांकडून खेळविले जातात.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : एकोडी येथे क्रीडा सत्राचे उद्घाटन

आॅनलाईन लोकमतएकोडी : स्वदेळी खेळोत्तेजक मंडळाचा इतिहास जुना असून या मंडळाची स्थापना ८० वर्षांपूर्वी संयुक्त जिल्हा असलेल्या काळाची आहे. या मंडळाच्या माध्यमातून स्वदेशी खेळ दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांकडून खेळविले जातात. त्यातून विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास होण्यास मदत होते, असे मत आमदार तथा लोकलेखा समितीचे अध्यक्ष गोपालदास अग्रवाल यांनी केले.स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाच्या वतीने आयोजीत तालुका क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार विजय रहांगडाले होते. स्वागताध्यक्ष माधुरी हरिणखेडे होत्या. पाहुणे म्हणून जि.प. सदस्य रमेश अंबुले, पं.स. उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, सरपंच रविकुमार पटले, उपसरपंच देवलाल टेंभरे, पं.स. सदस्य जयप्रकाश बिसेन, पं.स. सदस्य प्रकाश पटले, दांडेगावच्या सरपंच बेबीनंदा चौरे, सहेसपूरचे सरपंच हितेश पतेह, एकोडी येथील ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी तसेच परिसरातील लोकप्रतिनिधी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, खेळाच्या माध्यमातून विद्यार्थी व शिक्षकांचा सलोखा दिसून येतो. तसेच सदर कार्यक्रम करण्याकरिता लोकसहभागाचा निधी अपुराच पडत असतो. त्यामुळे स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाला शासनाचे आर्थिक सहकार्य मिळाले तर या खेळांचा दर्जा उंचावण्यास मदत होईल. त्याकरिता सरकारकडे मागणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.या वेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन उद्घाटक आमदार अग्रवाल व आ. रहांगडाले यांच्या हस्ते स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाचे ध्वजारोहण करण्यात आले. या तालुकास्तरीय क्रीडा सत्रात १३ केंद्रांपैकी १५ शाळांचा सहभाग होता. त्यांच्यामार्फत उपस्थित मान्यवरांना मानवंदना देण्यात आली.प्रास्ताविक स्वदेशी खेळोत्तेजक मंडळ सचिव चंद्रशेखर दमाहे यांनी मांडले. संचालन उपाध्यक्ष यु.पी. बिसेन यांनी केले. या तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतीक कार्यक्रमासाठी केंद्रांतर्गत येणाºया सर्वच शाळांतील शिक्षक व कर्मचाºयांनी सहकार्य केले.