शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 00:34 IST

मुर्री येथील जिल्हा परिषदे शाळेत एका शिक्षकाने विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केल्याची घटना महिनाभरापूर्वीच घडली होती.

ठळक मुद्देजि.प.च्या सर्वसाधारण सभेत घोषणा : विद्यार्थिनीशी अश्लील चाळे प्रकरण

ऑनलाईन लोकमतगोंदिया : मुर्री येथील जिल्हा परिषदे शाळेत एका शिक्षकाने विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केल्याची घटना महिनाभरापूर्वीच घडली होती. मात्र मुख्याध्यापकाने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याने मुख्यध्यापकावर निलंबनाची कारवाई करण्याची घोषणा जि.प.अध्यक्ष व सीईओ यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण मंगळवारी (दि.१३) केली.मुर्री येथील जिल्हा परिषद शाळेतील एका ७ वर्षाच्या विद्यार्थिनीला शिक्षक लक्ष्मीचंद हरिणखेडे (५०) याने मध्यान्ह सुटीत एका खोलीत बंद करून तिच्याशी अश्लील चाळे केले. पिडीत मुलीच्या आईच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ३५४ (अ), (ब) सहकलम ८,१०,१२ बाललैंगिक अत्याचार अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ह्या प्रकरणाला लोकमतने उचलून धरले होते. याचीच दखल जिल्हा परिषदेच्या मंगळवारी आयोजित सर्वसाधारण सभेत जि.प.चे विरोधी पक्षनेते गंगाधर परशुरामकर यांनी हा मुद्दा लावून धरला. माजी शिक्षण सभापती पी.जी.कटरे, माजी बांधकाम सभापती रचना गहाणे, जि.प. सदस्य किशोर तरोणे, रमेश चुऱ्हे, सुरेश हर्षे, राजलक्ष्मी तुरकर यांनी देखील परशुरामकर यांच्या मुद्याचे समर्थन केले. तब्बल एक तास या प्रकरणावर चर्चा घडवून आणली. अखेर या प्रकरणात मुख्याध्यापक आनंद पुंजे यांनी या प्रकरणाला दाबून ठेवले म्हणून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची घोषणा जि.प.अध्यक्ष व मुकाअ डॉ. राजा दयानिधी यांनी केली. सभेला जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, उपाध्यक्ष अल्ताफ हमीद अकबरअली, महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे, शिक्षण सभापती रमेश अंबुले, पशुसंवर्धन सभापती शैलजा सोनवाने, समाज कल्याण सभापती विश्वजीत डोंगरे, मुकाअ डॉ. राजा दयानिधी, सर्व विभागाचे विभाग प्रमुख व जि.प. सदस्य उपस्थित होते. यावेळी पाणी पुरवठा विभागाचेही मुद्दे समोर आले.‘त्या’ योजनेत ७० लाखांचा घोळजिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत सावित्रीबाई फुले कन्या प्रोत्साहन योजनेतर्गंत एक अथवा दोन मुलीवर प्रोत्साहन राशी म्हणून ८ हजार रुपयांचे राष्ट्रीय बचतपत्र व २ हजार रूपये रोख असे १० हजार रूपये देण्याचे शासनाचे निर्देश आहे. गोंदिया जिल्ह्यात मुलींना जन्म देणाºया हजारो कुटुंबाना या योजनेचा लाभ देण्यात आला नाही. हा मुद्दा प्रथम आमगाव तालुक्याच्या बनगाव येथील जिल्हा परिषद सदस्य सुखराम फुंडे यांनी उचलून धरला होता. त्यावरही कारवाई झाली नाही. पुन्हा ४ महिन्यापूर्वी या मुद्याला उचलून धरण्यात आले. यात जि.प.चे मुख्य व वित्त लेखा अधिकारी अ.क.मडावी यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. चौकशीत या योजनेत ७० लाख रुपयांचा घोळ झाल्याचे समोर आले आहे. हे प्रकरण २०१० पासून सुरू आहे. त्यामुळे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.के.मेश्राम, डॉ. राजकुमार गहलोत, डॉ. हरिश कळमकर यांचे निलंबन करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठवावा, तसेच जिल्हा परिषदेने नियुक्त केलेले कर्मचारी जे या योजनेच्या घोळात सहभागी आहेत असे लांजेवार, वित्त विभागातील हरिणखेडे यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी सदस्यांनी केली.अश्लील चाळे करणारा शिक्षक निलंबितजिल्हा परिषद शाळा मुर्री येथील सहाय्यक शिक्षक लक्ष्मीकांत हरिणखेडे याने महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा वर्तवणूक नियम १९६७ चे कलम ३ चा भंग केल्याने त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. १२ मार्च रोजी त्याला मुकाअ डॉ. राजा दयानिधी यांनी निलंबित केले.