शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २० एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2021 05:00 IST

राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्यात यावे यासह काही अन्य मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी २७ ऑक्टोबरपासून संप पुकारला आहे. यावर परिवहन मंत्र्यांनी कर्मचाऱ्यांना १ टक्के घरभाडे भत्ता व २८ टक्के महागाई भत्ता देण्याचे मान्य केले. मात्र, राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण हीच मुख्य मागणी पूर्ण केली नाही. यावर कर्मचारी संतापले असून त्यांनी संप सुरूच ठेवला आहे, तर या संपात ३१ ऑक्टोबरपासून गोंदिया व तिरोडा आगारातील कर्मचारी सहभागी झाले असून, त्यामुळे संपूर्ण फेऱ्या रद्द आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी संपाला घेऊन ठाम असतानाच आता महामंडळाकडून संपात असलेल्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जात आहे. त्यानुसार जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा आगारातील प्रत्येकी १० अशा एकूण २० कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. यामुळे आता या संपाला घेऊन कर्मचारी गटातून काय प्रतिसाद दिला जातो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्यात यावे यासह काही अन्य मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी २७ ऑक्टोबरपासून संप पुकारला आहे. यावर परिवहन मंत्र्यांनी कर्मचाऱ्यांना १ टक्के घरभाडे भत्ता व २८ टक्के महागाई भत्ता देण्याचे मान्य केले. मात्र, राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण हीच मुख्य मागणी पूर्ण केली नाही. यावर कर्मचारी संतापले असून त्यांनी संप सुरूच ठेवला आहे, तर या संपात ३१ ऑक्टोबरपासून गोंदिया व तिरोडा आगारातील कर्मचारी सहभागी झाले असून, त्यामुळे संपूर्ण फेऱ्या रद्द आहेत. ऐन सणासुदीत करण्यात आलेल्या या संपामुळे नागरिकांची अडचण होत असल्याने उच्च न्यायालयानेही संप मागे घ्यावा, असे सांगितले होते, तर सोमवारी (दि.८) कर्मचारी प्रतिनिधी, शासन प्रतिनिधींसोबत झालेल्या चर्चनंतर उच्च न्यायालयाने १२ आठवड्यांत प्रक्रिया पूर्ण करणार असेही स्पष्ट केले. मात्र, त्यानंतरही कर्मचारी मागणी पूर्ण होईपर्यंत संप सुरूच राहणार, असा पवित्रा घेऊन आहेत. अशात महामंडळाने मंगळवारी (दि.९) संपात सहभागी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, गोंदिया आगारातील १० तर तिरोडा आगारातील १० अशा एकूण २० कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. 

कारवाईमुळे कर्मचाऱ्यांत रोष - महामंडळाकडून कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांत चांगलाच रोष वाढला आहे. एकीकडे मागणी पूर्ण न करता कर्मचाऱ्यांचे निलंबन करणे चुकीचे असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, यानंतरही संप सुरूच राहणार, यावर कर्मचारी अडून आहेत.

 

टॅग्स :state transportएसटी