शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ भारत अभियानाची केंद्रीय समितीद्वारे पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 21:57 IST

शहर पूर्ण हागणदारीमुक्त झाले असून जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय समित्यांकडून शहराला हागणदारीमुक्त व स्वच्छ शहर घोषित करण्यात आले. त्यानंतर आता केंद्र सरकारच्या त्रयस्त अशा क्यूसीआय या संस्थेमार्फत देवरी शहराची ओडीएफ व स्वच्छतेसंदर्भात

ठळक मुद्देजिल्हास्तरीय व राज्यस्तरीय समित्यांकडून शहराला हागणदारीमुक्त व स्वच्छ शहर घोषित

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : शहर पूर्ण हागणदारीमुक्त झाले असून जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय समित्यांकडून शहराला हागणदारीमुक्त व स्वच्छ शहर घोषित करण्यात आले. त्यानंतर आता केंद्र सरकारच्या त्रयस्त अशा क्यूसीआय या संस्थेमार्फत देवरी शहराची ओडीएफ व स्वच्छतेसंदर्भात पाहणी करण्याकरिता शुक्रवारी (दि.२२) व शनिवारी (दि.२३) रोजी क्यूसीआय समितीने भेट देऊन पाहणी केली.या वेळी या समितीने देवरी शहरातील ओडीएफ स्पॉट, सार्वजनिक शौचालय व त्यांचा वापर, सोईसुविधा, शहर सौंदर्यीकरण याबाबतीचा आढावा घेतला.या समितीमध्ये पर्यवेक्षक गोविंद चव्हाण व ऋषीराज रॉय यांचा समावेश होता. त्यांच्या भेटीदरम्यान नगराध्यक्ष सुमन बिसेन, उपाध्यक्ष ओमप्रकाश, बांधकाम सभापती आफताब उर्फ अन्नूभाई शेख, गटनेते संतोष तिवारी, नगरसेवक यादोराव पंचमवार, प्रवीण दहीकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.क्यूसीआय पथकाने शुक्रवारी (दि.२२) देवरी शहरात आगमन झाल्यानंतर प्रथम त्यांनी मनोहरभाई पटेल हायस्कूल संलग्न कनिष्ठ महाविद्यालय, राणी दुर्गावती चौक मार्केट परिसर, बाजार चौक, पटाची दान, केशोरी तलाव व चिचगड रोड येथील सार्वजनिक शौचालय, बस स्टॅन्ड आणि माँ धुकेश्वरी मंदीर परिसरातील शौचालयविषयक सुविधा व स्वच्छतेसंदर्भात संपूर्ण आढावा घेतला. जीपीएस पध्दतीने जीओटॉग फोटो व आपला अहवाल आॅनलाईन दिल्लीला पाठविला.याप्रसंगी मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे यांना या बाबतीत समितीने विचारले असता त्यांनी सांगितले की, शहर संपूर्ण हागणदारीमुक्त झाले आहे. प्रत्येक घरी शौचालय असल्याने कोणताही नागरिक उघड्यावर शौचास जात नाही. तसेच बाहेरुन येणाºया लोकांकरिता, व्यापारी वर्गाकरिता शहरात विविध ठिकाणी दहा सार्वजनिक शौचालये व स्वच्छतागृह बांधून पूर्ण झाले आहेत. तेथे पाणी व विजेची सुविधा आहे. त्यामुळे क्यूसीआय पाहणीत सकारात्मक परिणाम प्राप्त होऊन देवरी शहराला पुन्हा एक सन्मान मिळण्याची शक्यता आहे. देवरी नगरी क्यूसीआय समितीच्या पाहणीला समोर जाणारी नागपूर विभागातील नवनिर्मित नगर पंचायतमधील एकमेव पहिली नगर पंचायत आहे, ही बाब देखील विशेष महत्त्वाची आहे. या वेळी नगराध्यक्ष सुमन बिसेन यांनी नगर पंचायतने अतिशय नियोजनपूर्वक आखणी करुन कठोर मेहनत घेतल्याने हे शक्य झाले, असे बोलून दाखविले. यात मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे यांनी सुरूवातीपासून शौचालय बांधणे व उघड्यावर बसू नये, याकरिता विशेष प्रयत्न केल्याने व नागरिकांनी या अभियानात सहकार्य दिल्याने देवरी शहर संपूर्ण हागणदारीमुक्त होऊ शकले. तसेच या कामात नगर पंचायतच्या कर्मचाºयांना सुद्धा याचे श्रेय दिले आहे.