शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

सर्व्हेक्षणाच्या पडताळणीसाठी पथकाची ‘सरप्राईज व्हिजीट’

By admin | Updated: February 8, 2017 00:56 IST

शहरातील स्वच्छता विषयक काय सोई उपलब्ध आहेत व शहरवासीयांना आणखी काय हवे आहे

७ ते ९ तारखेदरम्यान सर्वेक्षण : गोंदिया शहरातील स्वच्छतेची होणार पडताळणी कपिल केकत  गोंदिया शहरातील स्वच्छता विषयक काय सोई उपलब्ध आहेत व शहरवासीयांना आणखी काय हवे आहे हे जाणून घेण्यासाठी १७ ते १९ जानेवारी दरम्यान शहरात स्वच्छता सर्वेक्षण करण्यात आले. विशेष म्हणजे गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या पथकाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणाची पडताळणी करण्यासाठी आता विभागाचे पथक पुन्हा ७ ते ९ या कलावधीत शहरात सर्वेक्षण करणार आहेत. यात मागील सर्वेक्षणातील ठिकाणांची पाहणी करून ते त्याची पडताळणी करणार असल्याची माहिती आहे. अवघ्या देशाला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी केंद्र शासनाकडून स्वच्छता मिशन राबविले जात आहेत. त्यातंर्गत टप्याटप्याने काही ना काही नवनवे प्रयोग करून देशवासीयांत स्वच्छतेबाबत जागरूकता आणण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत. प्रत्येक व्यक्ती स्वच्छतेप्रती आपली जबाबदारी जाणून घेतल्याशिवाय शासनाचे हे प्रयत्न फलितास येणार नाहीत. त्यामुळे देशवासीयांना जागरूक करून त्यांचा सहभाग मिळवून घेण्यासाठी ही सर्व खटाटोप सुरू आहे. यात प्रत्येक नागरिकांना काय हवे आहे हे सुद्धा जाणून घेणे तेवढेच गरजेचे आहे. यातूनच स्वच्छता सर्वेक्षण हा नवा प्रयोग केला जात आहे. केंद्र शासनाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून हा प्रयोग केला जाणार असून यांतर्गत राज्यातील ४४ शहरांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे स्वच्छता सर्वेक्षणाचा हा दुसरा टप्पा असून यात गोंदिया शहराचीही निवड करण्यात आली आहे. यांतर्गत १७ ते १९ जानेवारी दरम्यान गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून शहरात स्वच्छता सर्वेक्षण करण्यात आले. यासाठी विभागाचे कमलेश मिशाद व अंजन यादव शहरात आले होते. या सर्वेक्षणांतर्गत नगर परिषदेकडून माहिती मागविण्यात आली होती. त्या माहितीच्या आधारे पथकातील मिशाद यांनी शहरातील शास्त्री वॉर्ड, छोटा गोंदिया, अंगूर बगिचा व मोक्षधाम परिसरातील रस्ते व स्वच्छतेची पाहणी केली होती. तर यादव यांनी विभागाकडून प्राप्त झालेल्या प्रश्नावलीत नोंद घेऊन त्या संबंधीचे पुरावे नगर परिषदेकडून घेतले होते. दोघांनी या सर्वेक्षणाचा अहवाल विभागाकडे जमा करावयाचा होता व येथे त्यांचे काम संपले होते. मात्र या दोघांनी केलेल्या सर्वेक्षणाची पडताळणी करण्यासाठी आता विभागाचे विशेष पथक ७ ते ९ तारखेदरम्यान गोंदियात येणार असल्याची माहिती आहे. या पडताळणी सर्वेक्षणात ते मागील पथकाने केलेल्या सर्वेक्षणातील ठिकाणांची पाहणी करणार असून आहे ती स्थिती जाणून घेणार आहेत. तर आता या पथकाने सादर केलेल्या अहवालाच्या आधारावरून शहराची रॅकींग होणार असल्याचेही कळले.