शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ज्योतीच्या लग्नात अनेक दानदात्यांचा हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 21:43 IST

ज्योती ठाकरे या अनाथ मुलीच्या लग्नात डॉ. सविता बेदरकर व अमरचंद ठवरे यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सामाजिक दानदात्यांचा हातभार लागला. यातूनच हजारो वºहाड्यांच्या साक्षीने आशीर्वादाच्या गंध अक्षता उधळून ज्योतीचा लग्न सोहळा थाटात पार पडला.

ठळक मुद्देबेदरकर यांचा पुढाकार : अनेकांचा लाभला आशीर्वाद

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : ज्योती ठाकरे या अनाथ मुलीच्या लग्नात डॉ. सविता बेदरकर व अमरचंद ठवरे यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सामाजिक दानदात्यांचा हातभार लागला. यातूनच हजारो वऱ्हाड्यांच्या साक्षीने आशीर्वादाच्या गंध अक्षता उधळून ज्योतीचा लग्न सोहळा थाटात पार पडला.अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम सोमलपूर येथील ज्योती व कुणाली ठाकरे या दोघा बहिणी जन्मदात्यांच्या आधार हिरावून गेल्याने ग्राम मांडोखाल येथे मामाकडे राहत आहेत. तालुक्यात जन्मदात्या मायबापांचे छत्र हिरावून बसलेली २० मुले-मुली जीवन जगत आहे. घरामध्ये कमावता नसल्याने पुढील आयुष्य जगायचे कसे हा मोठा यक्ष प्रश्न त्या अनाथांसमोर पडतो. त्यांच्या दैनंदिन जीवनात जन्मदात्यांची उणीव भासू नये म्हणून डॉ. बेदरकर व ठवरे त्यांना सर्वतोपरी मदतीसाठी प्रयत्नरत राहतात. अशातच, अनाथ ज्योती विवाह योग्य वयात आल्याने तिचा मामा भागवत राऊत यांनी तिच्यासाठी विवाह स्थळ शोधले. मायबाप नसल्याने ज्योतीच्या लग्नासाठी जिल्ह्यातील समाजशील दानशूरांकडून योगदान मिळावे म्हणून ‘लोकमत’च्या माध्यमातून डॉ. बेदरकर, सामाजिक कार्यकर्ते ठवरे यांनी वेळोवेळी मदतीचे आवाहन केले. ‘लोकमत’च्या वृत्ताने अनेकांनी मदत करण्याची इच्छा प्रगट करुन आपल्या परीने ज्योतीच्या लग्न कार्यासाठी खारीचा वाटा उचलला.लाभला दानदात्यांचा हातभारज्योतीच्या लग्न कार्यासाठी गोंदियाचे सेवानिवृत्त तिकीट निरीक्षक कठाणे यांनी संपूर्ण गृहपयोगी भांड्यांचा संच, एस.एस.जे. महाविद्यालयातील प्रा. डॉ. कल्पना सांगोळे यांच्याकडून गोदरेज कपाट, तुळशीकर ब्रदर्श यांच्याकडून कुलर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक विठ्ठलराव नेवारे यांनी कुकर, चांडक बंधू यांच्याकडून गॅस संच, सहकार अधिकारी प्रशांत गाडे, बाजार समितीचे सचिव अशोक काळबांधे, वनपरिक्षेत्राधिकारी छगन रहांगडाले, गोंदियाच्या मंजुषा कार्लेकर, ठाणेदार देशमुख, मनिषा नशिने, आरती चवारे, प्रा. वैशाली कोहपरे, सुनंदा भुरे, डॉ. भूषण मेश्राम, चोयराम गोपलानी, राखी ठाकरे, विश्वदीप डोंगरे, मुन्ना यादव, सुषमा देशमुख, सडक-अर्जुनीचे शिक्षक अनिल मेश्राम, आर.व्ही. मेश्राम, यु.आर. तांदळे, पोलीस निरीक्षक शिवराम कुंभरे, शालू कृपाले, प्रकाश काशीवार इत्यादींचा या मंगल परिणय सोहळ्यात हातभार लागला.सुखमय जीवनासाठी मनोकामनामांडोखाल येथे बुधवारी अनाथ ज्योतीचे लग्न पार पडून वैवाहिक जीवनात समाजसेवी व वºहाड्यांच्या साक्षीने तिने पदार्पण केले. तिचे वैवाहिक जीवन सुखी व आनंदी जावो, अशी मनोकामना करुन आशीर्वाद देण्यासाठी गोंदियाच्या सविता बेदरकर, शालू कृपाले, मनिषा पशिने, अर्जुनी-मोरगावच्या प्रा. कल्पना सांगोडे, गोरेगावच्या वैशाली कोहपरे, सडक अर्जुनीचे अनिल मेश्राम, अमरचंद ठवरे, गडचिरोलीचे समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, विलास लेंडे यांच्यासह हजारो वºहाडी उपस्थित होते.

टॅग्स :marriageलग्न