शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

मतदार ओळखपत्राला आधारची लिंक

By admin | Updated: April 29, 2015 00:04 IST

निवडणूक विभागाने निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने प्रत्येक मतदार ओळखपत्राला आधारकार्ड जोडण्याची मोहिम सर्वत्र सुरू केली आहे.

बीएलओ लागले कामाला : आॅनलाईन सुविधा उपलब्ध गोंदिया : निवडणूक विभागाने निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने प्रत्येक मतदार ओळखपत्राला आधारकार्ड जोडण्याची मोहिम सर्वत्र सुरू केली आहे. यांतर्गत रविवारी सुटीच्या दिवशी मतदान केंद्रावर मतदारांचा मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक बीएलओ रजिस्टरवर नोंद करून घेत आहेत. मतदाराची ओळख करून देणारे मतदार ओळखपत्र निवडणुकीच्या प्रक्रियेत अत्यंत महत्वाचे दस्तावेज मानले जाते. हे मतदार ओळखपत्र विना अडथळा मतदानाचा हक्क बजविण्यास मदत करते. मात्र दूरूपयोग व राजकीय स्वार्थ साधणाऱ्या काही राजकीय नागरिकांनी मात्र याचा दूरूपयोग करून दोन ते तीन ओळखपत्र तयार करवून घेतल्याचे कळते. गणातील आरक्षण बघता याच मतदान ओळखपत्रांचा वापर करण्यासाठी शक्कल लढवून मतदार ओळखपत्र त्यांचेसाठी फायद्याचे ठरत असले तरी शासकीय यंत्रणेला डोकेदुखीचा विषय बनला आहे.व्यक्ती ज्याठिकाणी बदली घेवून जातात त्या ठिकाणचे मतदार ओळखपत्र तयार करतात, असे मतदार दोन ते तीन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी मतदान करीत असल्याच्या घटनाही उजेडात आल्या आहेत. मात्र मतदार यादीत नाव आहे. त्याचबरोबर ओळखपत्र असल्याने निवडणूक विभागही कोणतीच कारवाई करू शकत नाही. या प्रकाराला आळा घालण्यासाठी मतदार ओळखपत्राला आधारकार्ड जोडण्याची मोहिम जिल्हाभर सुरू आहे. तालुकास्तरावर जिल्हा निवडणूक विभागाने ब्लॉक लेव्हल आॅफीसरकडे (बीएलओ) हे काम सोपविले आहे. यात एका रजिस्टरमध्ये मतदार ओळखपत्रांचे क्रमांक व मतदारांचे नाव देण्यात आले आहे. त्यासमोर मोबाईल क्रमांक व आधार क्रमांकाचा स्वतंत्र रकाना तयार करण्यात आला आहे. हे दोन रकाने ब्लॉक लेव्हल आॅफीसर केंद्रावर जावून संबंधीतांकडून भरून घेत आहेत.पुढे येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत निवडणुकी दरम्यान संभाव्य चूका किंवा बोगस मतदान होवू नये ही बाब लक्षात घेत सर्व मतदार ओळखपत्र आधार कार्डने जोडण्याची मोहिम राबविण्यात येत आहे. मतदार कार्डाला आधार कार्ड जोडल्या बरोबर संबंधित व्यक्तीचे नाव दोन जिल्ह्यांच्या निवडणूक यादीत किंवा दोन गावांच्या निवडणूक यादीत असल्यास ते लक्षात घेवून जिल्ह्याच्या मतदार यादीतून कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होण्यात मदत होईल. (शहर प्रतिनिधी)मोहीम ३१ जुलैपर्यंत मतदार ओळखपत्रासोबत आधारकार्ड क्रमांक लींक करण्याची ही मोहीम येत्या ३१ जुलै पर्यंत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत महिन्याच्या दुसऱ्या रविवारी विशेष अभियान घेतले जात आहे. त्यानुसार येत्या १७ मे रोजी हे अभियान राबविले जाणार. यासाठी बीएलओंकडे जबाबदारी असून त्यांना मतदान केंद्रांवर सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत काम करायचे असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी सांगितले.