शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना रोहयोचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 22:48 IST

यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे अनेक ठिकाणी दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देमजुरांच्या हाताला मिळाले काम : शेतकऱ्यांना झाली मदत

आॅनलाईन लोकमतनिंबा-तेढा : यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे अनेक ठिकाणी दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांना धानाच्या शेतीची लागवड करता आली नाही. लागवड झालीच तर खूप कमी प्रमाणात. अशा शेतकऱ्यांना आता रोजगार हमी योजनेचा आधार मिळाला आहे.ज्या शेतकºयांना पाण्याचे कोणतेच साधन नव्हते, जे शेतकरी वरच्या पाण्यावर अवलंबून आहेत, त्यांनी नदी, नाले तसेच खड्ड्यातील पाणी मोटार पंपाद्वारे घेवून धानाची रोवणी केली. मात्र पावसाने एैनवेळीे दगा दिल्याने हाती आलेले पिक गमविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. शेकडो हेक्टर जमीन पडीक राहिली. कित्येक शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन तसेच घरातील दागिने गहान ठेऊन धानाचे बियाणे व खत खरेदी केले. ते आता कर्जबाजारी झाल्यामुळे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा या चिंतेत होते.एकीकडे वाढती महागाई आणि दुसरीकडे हाताला काम नसल्याने शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये चिंतेचे वातावरण होते. परंतु निंबा क्षेत्रातील शेतकरी व मजुरांना रोहयोचा आधार मिळाला आहे. यावर्षी निंबा वनक्षेत्रात गावकरी तसेच गावातील व जंगलातील जनावरांच्या हितासाठी तब्बल २ कोटी रुपयांची कामे वनविभागामार्फत मंजूर करण्यात आली आहेत. त्यामुळे निंबा वनक्षेत्रात येणाऱ्या गावांतील शेतकरी व मजुरांना याचा लाभ मिळणार आहे. निंबा येथे सुरु झालेल्या वनविभागाच्या अंतर्गत येणाºया रोहयोच्या पहिल्या कामावर एकूण २०० शेतकरी व मजुरांंना रोजगाराचा आधार मिळाला आहे. या कामामुळे शेतकरी व मजुरांची थोडीफार मदत होऊन त्यांना कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लागणार आहे. या सर्व कामांची देखरेख वन अधिकारी शेंडे व रोजगार सेवक हेमराज कोसरे करीत आहेत.