शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सुनील मेंढे यांचा नवेगावबांध येथे काळे झेंडे दाखवून निषेध 

By अंकुश गुंडावार | Updated: May 6, 2023 17:15 IST

Gondia News खा. मेंढे हे नवेगावबांध येथे एका कार्यक्रमासाठी जात असताना त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविला.

अंकुश गुंडावारगोंदियाः नवेगावबांध येथील पर्यटन संकुलातील रॉक गार्डनचे व कॉन्फरन्सचे हॉल या दोन कामांचे गेल्या १४ वर्षांपासून लोकार्पण न झाल्याने व निवडून आल्यानंतर गेल्या चार वर्षापासून याबाबत कुठली चर्चा व बैठक खा. सुनील मेंढे यांनी लावली नाही. याच्या निषेधार्थ नवेगावबांध फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (दि.६) सकाळी ११:३५ वाजताच्या सुमारास खा. मेंढे हे नवेगावबांध येथे एका कार्यक्रमासाठी जात असताना त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविला.

खा. मेंढे हे निवडून आल्यावर सत्कार स्विकारण्यासाठी अर्जुनी मोरगाव तालुक्यात आले होते. यावेळी येथील टी पॉइंट चौकात नवेगावबांध फाउंडेशनच्यावतीने खा. मेंढे यांना निवेदन देऊन या कामाची आठवण करून देण्यात आली होती. यावर बैठक लावून चर्चा करू असे आश्वासन खासदारांनी त्यावेळी दिले होते. पण त्या आश्वासनाची त्यांनी अद्यापही पुर्तत: न केल्याने फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे. नवेगावबांध संघर्ष समितीच्यावतीने झालेल्या कामाचं लोकार्पण करा, अन्यथा दोषींवर कारवाई करा अशी मागणी करण्यात आली होती.

या मागणीला धरून नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष या नात्याने रामदास बोरकर यांनी लोकायुक्ताकडे दाद मागितली होती. यामध्ये लोकायुक्ताने गोदिया जिल्ह्याचे तत्कालीन दोन जिल्हाधिकारी व राज्याचे प्रिन्सिपल सेक्रेटरी यांना या प्रकरणात दोषी ठरविले होते. परंतु वर्षा मागून वर्ष लोटूनही नवेगावबांध येथील पर्यटन संकुलातील त्या गार्डनचे व कॉन्फरन्सचे लोकार्पण न झाल्याने, या गोष्टीचा निषेध म्हणून नवेगावबांध येथे शनिवारी (दि.६) येथील आझाद चौक येथे खा. सुनील मेंढे हे येथील विश्रामगृहावरून कार्यक्रम स्थळी जात असताना आझाद चौक येथे रामदास बोरकर, मुकेश चाफेकर, घनश्याम कापगते यांनी काळे झेंडे दाखवून निषेध केला. अचानक काळे झेंडे दाखवण्यात आल्यामुळे काही काळ त्या ठिकाणी गोंधळ उडाला.

खा. मेंढे यांना आपण प्रत्यक्ष भेटून विनंती केली की, आपल्या हातून हे काम झालेले आहे. आपण त्याची डागडूजी करून ते लोकार्पण करावे, ही अपेक्षा होती. तरी सुद्धा त्यांनी ते केलं नाही. त्याचे स्मरण करून द्यावे आणि याकडे दुर्लक्ष केले म्हणून, आम्ही खासदारांना काळे झेंडे दाखवून शनिवारी नवेगावबांध येथे निषेध केला.

- रामदास बोरकर, अध्यक्ष, नवेगावबांध फाउंडेशन.

टॅग्स :agitationआंदोलन