शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

सर्वात मोठ्या दिवसाचा योग

By admin | Updated: June 21, 2016 01:46 IST

२१ जून हा ग्रेगेरियन वर्षातील १७२ वा दिवस आणि लीप वर्षात १७३ वा दिवस असून हा विषुवृत्ताच्या उत्तरीय भागात

१४ तासांचा दिवस : आज सूर्याची स्थिती कर्करेषेच्या सरळ रेषेतसालेकसा : २१ जून हा ग्रेगेरियन वर्षातील १७२ वा दिवस आणि लीप वर्षात १७३ वा दिवस असून हा विषुवृत्ताच्या उत्तरीय भागात सर्वात मोठा दिवस असतो. २१ जून या दिवसाचे कालमान जवळपास १४ तासांचे तर रात्रीचे कालमान १० तासांच्या जवळपास असते.खगोलीय घटनेप्रमाणे २१ जूनला पृथ्वी आपला गोलार्थ बदलवत असून या दिवसापासून सूर्याचे काल्पनिक दक्षिणायन होण्याला सुरूवात होते. हा क्रम २१ डिसेंबरपर्यंत चालते. तोच २२ डिसेंबर वर्षातील सर्वात लहान दिवस असून त्यानंतर सूर्याची उत्तरायन होण्याची प्रक्रिया सुरू होऊन ती २१ जूनपर्यंत चालत असते. पृथ्वी २४ तासात एक वेळा स्वत: फिरत असून २४ तासात दिवस-रात्र घडत असतात. त्याचप्रमाणे स्वत: भोवती फिरत असताना पृथ्वी ३६५ दिवसांत सूर्याभोवती एक फेरा लावत असते. म्हणून ग्रेगेरियन कॅलेंडरप्रमाणे ३६५ दिवसांचा एक वर्ष मानला जातो. २१ जूननंतर वर्षातील १९३ दिवस उरले असतात. २१ जूनपासून सूर्याचे दक्षिणायन होण्याचे चक्र सुरू होत असून दिवस लहान आणि रात्र मोठी होण्याला सुरूवात होते. हा क्रम चालत असताना २३ सप्टेंबरला रात्र आणि दिवस दोन्ही समान म्हणजे १२-१२ तासांचे असतात. तसेच २२ डिसेंबरला पृथ्वी आपला गोलार्ध बदलून त्यानंतर सूर्याचे उत्तरायन क्रम सुरू होते आणि २३ मार्चला दिवस आणि रात्र समान १२-१२ तासांचे असतात. त्यानंतर दिवस मोठा होण्याचा क्रम सुरू राहत असून मार्चनंतर उन्हाळा व तापमान वाढत असतो. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना दर तीन महिन्यांत आपला गोलार्ध बदलण्याची प्रक्रिया करते. त्यामुळे या दरम्यान काही भाग सूर्याच्या सरळ रेषेत येतो, नंतर काही भाग निरकस दिशेत येतो. त्यामुळे एकाच वेळी पृथ्वीवरील काही भागात उन्हाळा तर काही भागात हिवाळा चालत असतो. पृथ्वीवर काल्पनिक रेखांचे जाळे आहेत. त्यातील आडव्या रेषांना अंक्षांश आणि उभ्या रेषांना देशांश म्हणतात. मधोमध शून्य अंशावरून गेलेली अंक्षाश रेखा विषुवृत्त असून उत्तरेकडे २३(१/२) अंशावर कर्कवृत्त आणि ६६(१/२) वर अर्काटीक वृत्त तर दक्षिणेकडेही एवढ्याच अंतरावर मकरवृत्त व अंटार्टिक वृत्त आहेत. उत्तरेकडील कर्कवृत्त हे भारताच्या मधोमध गेले असून २१ जूनला सूर्याची स्थिती कर्करेषेच्या सरळ रेषेत असून या वेळी प्रचंड तापमान वाढलेले असते.भारतात वेळेचे निर्धारण४पृथ्वीवरील उभ्या काल्पनिक देशांश रेखांपैकी ८२(१/२) अंशावरील देशांश रेखा ही वाराणसी या शहराजवळून गेलेली आहे. भारताचे रोजच्या वेळा निर्धारण या ८२(१/२) वरील देशांश रेषेवर होत असते. हा वेळ संपूर्ण भारतात चालतो. यानुसारच घड्याळ्यातील वेळ निश्चित केली जाते.२१ जून आणि योग दिवस ४२० आणि २१ जून आपल्या पृथ्वीसाठी फार महत्वाचे दिवस आहेत. यांचा सरळ संबंध पृथ्वी आणि सूर्याशी असतो. या दिवशी सूर्य किरणांनी उष्ण कटिबंधातील अंक्षाशांवर सरळ प्रभाव पडतो. एकीकडे प्रचंड उन्हाळा तर दूसरीकडे प्रचंड हिवाळा, असा प्रभाव पडतो. २१ जूनला योग केल्यास सूर्याचा मोठा प्रभाव मानवी शरीरावर पडत असतो. भारतीय योग शास्त्राप्रमाणे २१ जूनपासून सूर्याचे दक्षिणायन होणे साधना पद आणि डिसेंबरपासून उत्तरायण होणे ज्ञान पद मानले जाते. १८ ते ४८ डिग्री तापमानात राहणाऱ्या लोकांवर २० आणि २१ जूनच्या दिवसाचा मोठा प्रभाव पडतो. याचा अभ्यास करून संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून योग दिवस साजरा करण्याची स्वीकृत्ती दिली आहे.