शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

प्रेयसीचा खून करून प्रियकराची गळफास घेऊन आत्महत्या; तिचे लग्न दुसऱ्याशी जुळल्याने होता नाराज

By नरेश रहिले | Updated: December 24, 2023 20:00 IST

सालेकसा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पुराडा येथील प्रेमभंग झालेल्या तरूणाने आपल्या प्रेयशीचा गळा आवळून खून केला.

गोंदिया : सालेकसा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पुराडा येथील प्रेमभंग झालेल्या तरूणाने आपल्या प्रेयशीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वत:च त्याने पळसाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता उघडकीस आली. श्रीकांत महादेव कापगते (२२, रा. पुराडा, ता. देवरी) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याची प्रेयसी टिकेश्वरी सुकलाल मिरी (२२, रा. हलबीटोला, ता. देवरी, जि. गोंदिया) हिचा त्याने गळा आवळून खून केल्यानंतर त्याने स्वत:च गळफास घेत आत्महत्या केली.

श्रीकांतचे वडील विजय महादेव कापगते (५२, रा. पुराडा, ता. देवरी) हे २३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता आपल्या शेताकडे पाणी पाहायला गेले होते. दरम्यान, त्यांच्या शेताच्याच बाजूला असलेले शिवचरण गुनाजी आचले यांच्या शेतात पळसाच्या झाडाला फासावर श्रीकांत लटकलेला दिसला. श्रीकांत व टिकेश्वरी यांचे अनेक दिवसापासून प्रेमसंबध होते. या संबधातून ते दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार असे स्वप्न रंगवित असतांना टिकेश्वरीचे लग्न दुसऱ्या तरूणासोबत जोडण्यात आले. तेव्हापासून श्रीकांत आपल्या प्रेयशीला घेऊन चिंतेत होता. ती आपली व्हावी यासाठी तिला तो विनवणी करायचा. परंतु घरच्यांच्या समोर आपण बोलू शकणार नाही असे टिकेश्वरीचे म्हणणे होते. २२ डिसेंबर रोजी श्रीकांतने टिकेश्वरीला आपल्या गावी आणले. शेताकडे एकांतवास मिळेल म्हणून त्याने तिला शेतात नेले. लग्नाचा हट्ट केला परंतु टिकेश्वरने त्याचे न ऐकल्यामुळे त्याने तिला गळा आवळून खून केला. नंतर त्याने स्वत: गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. प्रियकरावर खुनाचा गुन्हाया प्रकरणात सालेकसा पोलिसांनी श्रीकांत महादेव कापगते (२२, रा. पुराडा, ता. देवरी) या प्रियकरावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेसंदर्भात सालेकसा पोलिसांनी २४ डिसेंबर रोजी भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. १३ दिवसात दोन प्रकरणेलग्नाच्या बेडीत अडकण्याला घेऊन आपल्या जीववार उदार होऊन जीव देण्याची तयारी दाखविणाऱ्या दोन घटना १३ दिवसात दोन घडल्या आहेत. गोंदिया जिल्ह्याच्या सडक-अर्जुनी तालुक्याच्या परसोडी येथे १२ डिसेंबर रोजी दोन तरूण-तरूणीने विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. विषप्राशन करणारा तरूण परसोडी येथील तर तरूणी भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परसटोला येथील आहे. त्या दोघांवर उपचार केला. सुदैवाने प्राणहाणी झाली नाही. ह्या घटनेनंतर १२ दिवसानेच दुसरी घटना कानावर पडते. त्यात प्रियकराने प्रेयशीचा खून करून स्वत: आत्महत्या केली. 

टॅग्स :gondiya-acगोंदियाLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट