शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

गणेशनगरवासीयांचा गुदमरतोय श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2021 05:00 IST

शहरातील २१ प्रभागांतून दररोज सुमारे ६० टन कचरा निघत असून, तो सर्व कचरा शहरातील मोक्षधाम परिसरात टाकला जात आहे. परिणामी मोक्षधाम परिसरच आता नगर परिषदेचे डम्पिंग यार्ड झाले आहे. तेथे सध्या कचऱ्याचे डोंगरच तयार झाले आहेत. टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यात कपडे, प्लास्टिक, चामडे आदींचा समावेश राहतो. अशात अज्ञात व्यक्तींकडून त्या कचऱ्याला दररोज सायंकाळी आग लावली जाते. या आगीमुळे कचऱ्यातून निघणारा हा विषारी धूर गणेशनगर परिसरात पसरत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नगर परिषदेकडे डम्पिंग यार्ड नसल्याने शहरात निघणारा कचरा मोक्षधाम परिसरात टाकला जात आहे. हा प्रकार एवढ्यावरच संपला नसून त्या कचऱ्याला कुणीतरी दररोज आग लावत असल्याने निघणाऱ्या धुरामुळे गणेशनगरवासीयांना आता श्वास घेणे कठीण झाले आहे. अशात आता जिल्हाधिकारी व नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना यावर काही तोडगा काढावा, अशी मागणी गणेशनगरवासीयांनी केली आहे.शहरातील २१ प्रभागांतून दररोज सुमारे ६० टन कचरा निघत असून, तो सर्व कचरा शहरातील मोक्षधाम परिसरात टाकला जात आहे. परिणामी मोक्षधाम परिसरच आता नगर परिषदेचे डम्पिंग यार्ड झाले आहे. तेथे सध्या कचऱ्याचे डोंगरच तयार झाले आहेत. टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यात कपडे, प्लास्टिक, चामडे आदींचा समावेश राहतो. अशात अज्ञात व्यक्तींकडून त्या कचऱ्याला दररोज सायंकाळी आग लावली जाते. या आगीमुळे कचऱ्यातून निघणारा हा विषारी धूर गणेशनगर परिसरात पसरत आहे. परिणामी राणी सती मंदिर, बालाजी मंदिर, स्टेट बँक कॉलनी, सेल्सटॅक्स कॉलनी, गौरीनगर, सर्कस मैदान, बिडवाईकर चॉल, सुबोध चौक, अशोक कॉलनी यांसह अन्य परिसरातील नागरिकांना दारे-खिडक्या बंद करून राहावे लागत आहे. कचऱ्यात असलेल्या कपडे, प्लॉस्टिक, चामडे यांसह अन्य रासायनिक वस्तूंपासून तयार झालेला हा धूर विषारी असतो. अशा विषारी धुरामुळे गणेशनगरवासीयांना आता श्वास घेणे कठीण होत आहे. यामुळे मोक्षधाम परिसरात कचरा टाकणे बंद करून कचऱ्याला आग लावणाऱ्याला पकडण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

गणेशनगरवासीयांचे आरोग्य धोक्यात- सध्या दिल्लीतील प्रदूषणाचा विषय चांगलाच गाजत असून, दिल्लीत लॉकडाऊनची गरज असल्याचे बोलले जात आहे. अशाच परिस्थितीत गणेशनगरवासी जगत असून धुरामुळे त्यांचेही आरोग्य धोक्यात असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. विविध प्रकारच्या वस्तूंपासून निघणारा किती विषारी असणार यावरून आता गणेशनगरवासी चांगलेच संतप्त आहेत. यामुळे आता हे प्रकरण काय वळण घेते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

खोकला, दमा, छाती व डोळ्यांत जळजळीचा त्रास वाढला- एरवी निघणारा धूर हवेतून उडून जातो. मात्र, हिवाळ्यात धुक्यामुळे हवेतच असतो व त्यामुळे त्रास अधिकच वाढतो. त्यात गणेशनगर परिसरातील नागरिकांकडून खोकला, दमा, छाती व डोळ्यांत जळजळ आदी समस्या वाढत असल्याचे सांगितले जात आहे.  जिल्हा व शहर प्रशासनाकडून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

१०० वर्षांनंतर घनकचरा प्रकल्प नाही- गोंदिया नगर परिषदेच्या स्थापनेला १०० वर्षांचा काळ लोटला असूनही आतापर्यंत नगर परिषदेकडे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नाही. शोकांतिका म्हणजे प्रकल्प तर सोडाच, प्रकल्पासाठी आतापर्यंत जागा मिळविण्यातही नगर परिषदेला यश आलेले नाही. मध्यंतरी ग्राम सोनपुरी येथे जागा घेतल्याचे सांगितले जात होते. मात्र, गावकऱ्यांनी त्याला विरोध केल्याने ही जागादेखील आता हातून गेल्यातच आहे. अशात आता जिल्हाधिकाऱ्यांनी काही तरी पावले उचलण्याची गरज आहे.

 

टॅग्स :dumpingकचरा