शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

अचानक वीज गायब; आता एका क्लिकवर झटपट सेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 18:05 IST

महावितरणने सुरू केली 'ऊर्जा चॅट बॉट' सेवा : ग्राहकांना होणार मदत

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : वीज खंडित होणे तशी सर्वसामान्य बाब आहे; परंतु अशा स्थितीत महावितरणशी संपर्क होत नाही, तेव्हा ही समस्या अधिक गंभीर होते. टोल फ्री नंबरवर कॉल घेतला जात नाही.

कार्यालयात गेल्यावर समाधानकारक उत्तर मिळत नाही. अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. मात्र, आता महावितरणने 'ऊर्जा चॅट बॉट' ही सेवा सुरू केली आहे. याचा वापर करून ग्राहकांना फक्त एका क्लिकवर त्वरित सेवा मिळू शकते. अचानक वीज गेली, बराच वेळ झाला वीज आली नाही, कार्यालयात संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही, वीज ग्राहकांची ही सर्वसामान्य आणि प्रत्येकाचीच तक्रार आहे. यावर आता कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महावितरणने 'ऊर्जा चॅट बॉट' ही सेवा सुरू केली आहे. यासोबतच इतर अनेक सुविधाही येथे दिल्या आहेत.

काय आहे 'ऊर्जा चॅट बॉट'? 'चॅट बॉट' हा एक संगणकीय प्रोग्राम आहे, हे लिखित किंवा बोललेल्या संभाषणाचे अनुकरण करते. त्याच्याशी इतर कोणत्याही व्यक्त्तीसारखे बोलले जाऊ शकते. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून ऊर्जा चॅट बॉटची सेवा महावितरणच्या वेबसाइट आणि मोबाइल अॅपवर २४ बाय ७ उपलब्ध आहे. याद्वारे ग्राहक महावितरणच्या सेवांबाबत इंग्रजी आणि मराठीत प्रश्न विचारू शकतात. त्यातून नवीन कनेक्शन, बिल भरणा, तक्रारी याबाबतची माहिती मिळू शकते.

कसा करणार वापर? वेबसाइट : कंपनीच्या वेबसाइटला भेट दिल्यावर, चॅट बॉटसाठी समानार्थी शब्द दिसेल. यावर क्लिक करून ग्राहक त्यांचे प्रश्न विचारू शकतात.मोबाइल अॅप : तुमच्या स्मार्ट फोनमध्ये महावितरणचे मोबाइल अॅप डाउनलोड करा. अॅपच्या चॅट बॉटवर क्लिक करून प्रश्न विचारले जाऊ शकतात.

या सेवा आहेत उपलब्ध

  • वीज खंडित झाल्याची तक्रार, बिले, नवीन जोडण्यांबाबत तक्रारी करा. 
  • बिल माहिती मिळवा. बिलदेखील येथे पाहिले आणि डाउनलोड केले जाऊ शकते. प्रश्नही विचारता येतील.
  • नवीन वीज कनेक्शन घेण्यासाठी आवश्यक माहिती आणि प्रक्रिया तुम्हाला मिळू शकते. 
  • महावितरणच्या विविध योजनांची माहिती मिळू शकते. 
  • विजेच्या वापराबाबतही माहिती मिळू शकते

समस्यांवर त्वरित उपाय : महावितरणग्राहकांना चांगली सुविधा दिल्याचा दावा महावित- रणने केला आहे. चॅट बॉटच्या मदतीने ग्राहकांना त्यांच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. ग्राहकांच्या समस्या लवकरच दूर केल्या जातील

टॅग्स :gondiya-acगोंदिया