शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

गणवेशाविना पहिल्या दिवशी विद्यार्थी जाणार शाळेत

By admin | Updated: June 8, 2014 00:01 IST

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करा, गणवेश मिळेल अशी व्यवस्था करा, खाऊ द्या, असे अनेक उपक्रम राबविण्याचे निर्देश शासनस्तरावरून देण्यात येतात. मात्र, त्याकरिता प्रशासकीय यंत्रणेकडून

निधीची मागणी : सव्वातीन कोटी रूपये मिळाले नाहीगोंदिया : शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करा, गणवेश मिळेल अशी व्यवस्था करा, खाऊ द्या, असे अनेक उपक्रम राबविण्याचे निर्देश शासनस्तरावरून देण्यात येतात. मात्र, त्याकरिता प्रशासकीय यंत्रणेकडून वेळेत निधीच मिळत नाही. हा प्रकार दरवर्षीचाच झाला. २६ जूनपासून शैक्षणिक सत्र सुरू होत आहे. वारंवार सर्वशिक्षा अभियान आपल्या विभागाकडे पत्रव्यवहार करते, परंतु ३ कोटी २६ लाख २५ हजार ६00 रुपयांचा निधी अजूनही प्राप्त झाला नाही. त्यामुळे या शैक्षणिक सत्राची सुरूवात विद्यार्थ्याना फाटक्या गणवेशातच करावी लागणार आहे.स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेले इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून गणवेश देण्यात येतो. विद्यार्थ्यांमधील गरीब-श्रीमंत हा भेद दूर होऊन त्यांच्यात एकता दिसावी, याचबरोबर त्यांच्यात शिक्षणाप्रती आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने शासनाने गणवेश देण्याची योजना सुरू केली. २६ जूनपासून शैक्षणिक सत्र सुरू होत आहे. सर्वशिक्षा अभियानाने ९१ हजार ८११ विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी गणवेश मिळावा, याकरिता महिन्याभराआधी जिल्हा परिषदेच्या सर्वशिक्षा अभियान विभागाने राज्य सरकारकडे ३ कोटी २६ लाख २५ हजार ६00 रुपये निधी मागणीचा प्रस्ताव पाठविला. परंतु अद्याप जिल्हा परिषदेला निधी पाठविण्यात आला नाही. त्यामुळे पुन्हा पाठपुरावा करण्यात आला. शाळा सुरू होण्याकरिता काही दिवस शिल्लक राहिलेत. त्यामुळे पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना नवीन गणवेश मिळणार नाहीत, हे आता स्पष्ट होऊ लागले. गतवर्षीदेखील ७५ टक्केच निधी देण्यात आला. त्यानंतर खूप उशिराने उर्वरित निधी मिळाला. जिल्हा परिषदेने स्थानिक पातळीवर गणवेश खरेदी करा, आम्ही निधी देऊ, असे फर्मान सोडले. शाळा व्यवस्थापन समित्यांनी कापड खरेदी करून विद्यार्थ्यांना दिले. तब्बल तीन महिन्यानंतर समित्यांना पैसे देण्यात आले. यावर्षीदेखील तोच प्रकार घडणार असल्याचे दिसून येते. गणवेश खरेदी करताना सबंधित तीन कापड विक्रेत्यांकडून दरपत्रक मागविण्यात यावे. तीन शिप्यांकडून गणवेश शिलाईचा प्रस्ताव मागवून त्यातून सर्वात कमी रक्कम असलेला विक्रेता आणि शिंप्याला कंत्राट देण्यात यावे, असे नियम आहेत. परंतु, कित्येक तालुक्यांमध्ये राजकारणी मंडळी हस्तक्षेप करून बल्क खरेदीच्या माध्यमातून कापड पुरवित असल्याच्या अनेक घटना यापुर्वी उघड झाले. त्यामुळे हा प्रकार रोखण्यात जिल्हा प्रशासन यावर्षी किती  यशस्वी ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)