शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी बसतात बंद शाळेच्या वऱ्हांड्यातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 22:33 IST

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार कमी पटसंख्या असलेल्या जिल्ह्यातील शाळा बंद केल्या जात आहेत. त्यामध्येच देवरी पं.स. अंतर्गत येणाऱ्या नवाटोला येथील १२ विद्यार्थी पटसंख्या असलेली शाळासुध्दा बंद झाली आहे.

ठळक मुद्देअपघाताचाही शक्यता : पालकांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार कमी पटसंख्या असलेल्या जिल्ह्यातील शाळा बंद केल्या जात आहेत. त्यामध्येच देवरी पं.स. अंतर्गत येणाऱ्या नवाटोला येथील १२ विद्यार्थी पटसंख्या असलेली शाळासुध्दा बंद झाली आहे. परंतु तेथील विद्यार्थ्यांची सोय न करण्यात आल्यामुळे तेथील विद्यार्थी सदर बंद शाळेच्या वऱ्हांड्यातच बसून असतात.नवाटोला हे गाव राष्ट्रीय महामार्गावर आहे. त्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांना देवरी येथील शाळेत ये-जा करणे धोक्याचे आहे. सत्र संपण्यासाठी थोडाच कालावधी बाकी असताना शाळा बंद पडल्याने पालकवर्ग चिंतेत सापडला आहे.या वर्षीचे सत्र संपण्याकरिता दोन ते तीन महिन्यांचा कालावधी उरला आहे. चालू सत्राचे शिक्षण गावच्या शाळेत पूर्ण होऊ द्यावे. पटसंख्या वाढीसाठी पालक वर्ग प्रयत्नशील आहेत. शाळा गावातच रहावी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांना पं.स. देवरी येथे निवेदन देण्यात आले. सीईओ यांनी सुध्दा अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे आश्वासन पालक वर्गाला दिले. पालकांसोबत आलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांसोबत मनमोकळी चर्चा करुन त्यांच्या वेदना ऐकून घेतल्या. तसेच विद्यार्थ्यांसोबत न्याय होईल, अशी ग्वाही दिली.या वेळी सभापती सुनंदा बहेकार, उपसभापती गणेश सोनबोईर, सरपंच विद्या खोटेले, पं.स. मेहतर, कोराम आदी उपस्थित होते.

टॅग्स :Schoolशाळा