शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

पोलीस विभागाच्या क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांचे सुयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:40 AM

आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांनी खेळात करियर घडवावे, या उद्देशाने शहीद बिरसा मुंडा जयंतीनिमित्त गोंदिया पोलीस विभागाच्या वतीने विविध क्रीडास्पर्धा घेण्यात आल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांनी खेळात करियर घडवावे, या उद्देशाने शहीद बिरसा मुंडा जयंतीनिमित्त गोंदिया पोलीस विभागाच्या वतीने विविध क्रीडास्पर्धा घेण्यात आल्या. यात देवलगाव येथील नत्थू पुस्तोडे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुयश मिळविले.१०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत वैशाली हिचामी, वर्षा कचलामी अनुक्रमे प्रथम व द्वितीय आल्या. तर अजय खते याने तिसरा क्रमांक पटकाविला. ८०० मीटर दौड स्पर्धेत मुलींमधून विशाखा कोल्हे प्रथम तर मुलांच्या गटातून राहुल मिरी याने प्रथम क्रमांक पटकाविला. १५०० मीटर दौड स्पर्धेत महेश्वरी कुळयामी द्वितीय तर जाकेश उईके याने प्रथम क्रमांक मिळविला. ५००० मीटर दौड स्पर्धेत विश्वनाथ नरोटे याने प्रथम, मुलींमधून वर्षा कुचलामी प्रथम, रिलेमध्ये वर्षा कुचलामी, वैशाली हिचामी, रिना सोनकलंत्री, रामुना सोलकलंत्री यांनी प्रथम तर मुलांमधून अजय खते, मेहरु मडावी, महावीर सियाम, महेश मडावी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.अ गटातून १०० मीटर दौडमध्ये फुलवंती कोरचा तर मुलांमधून निखिल हिचामी यांनी प्रथम क्रमांक, अक्षय हिडामी द्वितीय क्रमांक, रिले दौडमध्ये अविनाश धिकुंडी, निखिल हिचामी, अक्षय हिडामी, आकाश तुलावी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.रिले दौड मुलांमधून विकास कोरेटी, भूपेश ताडामी, टिकाराम होळी, स्वप्नील उसेंडी तर मुलींमधून फुलवंती कोरचा, सुलोचना कोराम, सिंधू हाशमी, कविता मसराम यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.ब गटातून १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सीमा गोळा प्रथम, रजवंती कोरचा द्वितीय तर मुलांमधून पवन सलामे तृतीय, ८०० मीटर दौडमध्ये मोनाली लुंगाटे प्रथम, नेहा पडोटी द्वितीय तर मुलांमधून अक्षरा हलामी तृतीय. १५०० मीटर दौडमध्ये भूमिता सोनकलश प्रथम, कोमल उईके द्वितीय, मुलांमधून दिलीप हिडामी द्वितीय, रिले दौड स्पर्धेत गीता कोरामी, राजवंती कोरचा, सीमा गोठा, मीरा नेताम प्रथम, मुलांमधून रिले दौडमध्ये गीता केरामी, रजवंती कोरचा, रेश्मा होळी, सीमा गोळा यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.नत्थुजी पुस्तोडे आदिवासी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल ठाणेदार स्वप्नील उनवणे, आश्रम शाळेचे संस्थापक केवळराम पुस्तोडे, मुख्याध्यापक मनोज कापगते, माध्यमिक विभागाचे प्राचार्य एम.पी. कुरुसुंगे यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे व क्रीडा शिक्षक विनायक लांजेवार, किशोर परशुरामकर, वाय.बी. कापगते, पी.एच. मेंढे यांचे कौतुक केले.

टॅग्स :Policeपोलिस