निखिल पिंगळे : विद्यार्थी शैक्षणिक चर्चासत्रगोंदिया : विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सेमीनार डॉ.बाबासाहेब आंबेडकर जिल्हा ग्रंथालय व जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या सहकार्याने मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आयपीएस अधिकारी निखिल पिंगळे व उपजिल्हाधिकारी सिद्धार्थ भंडारे उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना निखील पिंगळे म्हणाले की, आपल्या आयुष्यातील अडचणींवर मात करुन यश व मोलाचे पद यशस्वीरीत्या मिळविता येते. यासाठी नियमीत अभ्यास करावा लागतो. त्यात मात्र विद्यार्थ्यांनो रिव्हिजनवर भर द्या, असे मत जिल्ह्याचे पिंगळे यांनी व्यक्त केले. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिल्हा ग्रंथालयात शुक्रवारी घेण्यात आलेल्या शैक्षणिक चर्चासत्रात ते बोलत होते. या चर्चासत्राला उप जिल्हाधिकारी सिद्धार्थ भंडारा प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना पिंगळे यांनी, यावेळी अस्टिटंट कमांन्डेट, एसएससी, युपीएससी, एमपीएससीतून घेण्यात येणाऱ्या परीक्षेबद्दल माहिती देऊन या परीक्षा देण्यासाठी प्रेरणा दिली. तसेच त्यांनी स्वत: अभ्यास करताना कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले, याबद्दल विद्यार्थ्यांना समजावून सांगीतले. व्यायामापासून ते जेवणापर्यंत घेण्यात येणारी काळजी व त्यापासून मिळणारा फायदा याविषयी बारकाईने विद्यार्थ्यांना समजविण्यात आले.भंडारे यांनी, स्पर्धा परिक्षा कशाप्रकारे व्यवस्थितरित्या अभ्यास करुन, कोणत्याही अडचणी वर मात देऊन पार करता येईल याबाबत सांगितले. संचालन पूजा सोंजाल यांनी केले. कार्यक्रमासाठी अमोल डोंगरे व प्रदीप गणवीर यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांनो, सरावावर भर द्या
By admin | Updated: March 6, 2016 01:57 IST