लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : शिक्षण सोडून अगदी सकाळी झोपून उठल्यानंतर चिमुकले विद्यार्थी पालकांसह बँकेत खाते उघडण्यासाठी रांगेत ताटकळत उभे राहात आहेत. हे चित्र आठवडाभरापासून राष्ट्रीयीकृत बँकांसमोर बघावयास मिळत आहे.इतर मागासवर्ग प्रवर्गातील गरीब कुटुंबाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या पारंपारिक व्यवसायामध्ये मदत करावी लागते. अशा कुटुंबातील मुले नियमतिपणे शाळेत जाऊ शकत नाही त्यामुळे इयत्ता पहिली ते दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग मंत्रालयाने मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी शाळांत होऊ लागली आहे.यासाठी विद्यार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.एकाचवेळी प्रत्येक शाळेत सूचना दिल्या गेल्याने नवीन खाते उघडण्यासाठी पालक आपले कामधंदे सोडून चिमुकल्यांना घेऊन बँकेत येऊ लागले आहेत. खेडेगावावरून ही मंडळी सकाळीच निघते. बँक उघडण्यापूर्वी नंबर लावण्यासाठी रांगेत तासनतास प्रतीक्षा करीत असतात. कधीकधी तर दिवसभरही नंबर लागत नाही. परत दुसºया दिवशी यावे लागते. अनेकदा तर हा प्रमाणपत्र चालत नाही दुसरे आणा यासाठी परत केले जाते. कधी खाते उघडण्याचे फॉर्म संपलेले असतात. अशा नानाविध कारणांमुळे पालकांची मजुरी बुडते व विद्यार्थ्यांची शाळा बुडते. त्यामुळे विद्यार्थी व पालकही संकटात सापडले आहेत. बँकांनी शाळा शाळात शिबीर लावून विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडावे अशी पालकांची मागणी आहे.नियमित ग्राहकांनाही त्रासुबँकेला असलेल्या सुट्यांंमुळे बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना बँक खाते उघडण्यात अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. शिष्यवृत्ती आवेदनपत्र भरण्याची अंतिम दिनांक याच कालावधिीत असल्यास आणखीच पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. बँकांत वाढलेल्या या गर्दीमुळे नियमित इतर ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच योग्य नियोजन न करण्यात आल्याने बँक कर्मचाऱ्यांनाही याचा त्रास होत आहे.
शाळा सोडून चिमुकले बँकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 06:00 IST
इतर मागासवर्ग प्रवर्गातील गरीब कुटुंबाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या पारंपारिक व्यवसायामध्ये मदत करावी लागते. अशा कुटुंबातील मुले नियमतिपणे शाळेत जाऊ शकत नाही त्यामुळे इयत्ता पहिली ते दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग मंत्रालयाने मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे.
शाळा सोडून चिमुकले बँकेत
ठळक मुद्देपालकांसह चिमुकल्यांची बँकेत गर्दी : बँकेचे टाळाटाळीचे धोरण