शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

अंगावर झाड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू; दुचाकीवरून जाताना घडली घटना

By अंकुश गुंडावार | Updated: September 7, 2024 17:44 IST

Gondia : हलबीटोला ते सुरजाटोला मार्गावरील घटना

सालेकसा : मित्राच्या दुचाकीवरून वसतिगृहात जात असलेल्या विद्यार्थ्याच्या अंगावर अचानक झाड कोसळल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.६) तालुक्यातील हलबीटोला ते सूरजाटोला मार्गावर घडली. दानेश्वर मयालाल अडमे (२३), रा. मानागड असे अंगावर झाड कोसळून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील मानागड येथील दानेश्वर हा सालेकसा येथे वसतिगृहात राहून शिक्षण घेत होता. सुटी असल्याने तो गावकडे आई-वडिलांना भेटण्यासाठी गेला होता. शुक्रवारी (दि.६) आई-वडिलांची भेट घेऊन मित्रासह त्याच्या दुचाकीने तो सालेकसा येथे वसतिगृहात जात होता. दुचाकीवरून जात असताना अचानक हलबीटोला ते सूरजाटोला जवळ रस्त्यालगतचे एक झाड त्यांच्या दुचाकीवर कोसळले. यात मागे बसलेल्या दानेश्वरचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर त्याचा मित्र इश्वर प्रेमलाल उईके (१९) हा थोडक्यात बचावला. या घटनेची माहिती मिळताच सालेकसाचे तहसीलदार नरसय्या कोंडागुर्ले हे घटनास्थळी पोहचले. या घटनेची माहिती सालेकसा पोलिस स्टेशनला दिली. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक भूषण बुराडे ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. घटनास्थळी पंचनामा करून या घटनेची नोंद सालेकसा पोलिस स्टेशनला केली.

दानेश्वरची ती भेट ठरली अखेरची

दानेश्वर हा वसतिगृहातच राहून शिक्षण घेत होता. तो अभ्यासातसुद्धा हुशार होता. दरम्यान, सुटी असल्याने तो मानागड येथे आई-वडिलांना भेटण्यासाठी आला होता. मात्र आई-वडिलांची भेट घेऊन सालेकसा येथे परताना त्याच्या अंगावर झाड कोसळून मृत्यू झाला. त्यामुळे दानेश्वरची आई-वडिलांसह ती अखेरची भेट ठरली. या घटनेनमुळे दानेश्वरच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. तर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Accidentअपघातgondiya-acगोंदिया