शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

सारसांचा जिल्हा ओळख कायम ठेवण्यासाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 05:00 IST

महाराष्ट्रात केवळ गोंदिया जिल्ह्यात सारस पहायला मिळते. पाच वर्षापूर्वी गोंदिया जिल्ह्यात सारसांची संख्या आता ६० च्या घरात होती. परंतु किटनाशक व करंट लागून सतत सारसांचा मृत्यू होत असल्यामुळे आता गोंदिया जिल्ह्यात सारसांची संख्या ४० च्या घरात आहे.पावासाळ्याचे दिवस सारसांच्या विनीचा हंगाम असतो. सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत या सारसांच्या घरट्यांचे संवर्धन झाल्यास सारसांच्या संवर्धनासाठी मदत होईल.

ठळक मुद्देसारसांवर किटकनाशकाचे संकट : संरक्षण व्हावे : बंदी असलेलेही किटकनाशके बाजारात, जनजागृतीवर भर

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : निसर्गाचा लाजाळू पक्षी व शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून गणल्या जाणाºया सारसाचे निवासस्थान धानाचे पीक असलेल्या शेतात असते. परंतु धानाचे पीक जोमदार यावे यासाठी शेतकरीवर्ग धानावर थायमेट नावाच्या किटकनाशकाची फवारणी करतात. हे थायमेट सारसांचे कर्दनकाळ ठरत आहे. एकीकडे सारस संवर्धनासाठी तरूण झटताहेत तर दुसरीकडे सारसांचे वास्तव्य असलेल्या परिसरात थायमेटचा वापर वाढल्याने त्यांचे अस्तीत्व धोक्यात आले आहे.महाराष्ट्रात केवळ गोंदिया जिल्ह्यात सारस पहायला मिळते. पाच वर्षापूर्वी गोंदिया जिल्ह्यात सारसांची संख्या आता ६० च्या घरात होती. परंतु किटनाशक व करंट लागून सतत सारसांचा मृत्यू होत असल्यामुळे आता गोंदिया जिल्ह्यात सारसांची संख्या ४० च्या घरात आहे.पावासाळ्याचे दिवस सारसांच्या विनीचा हंगाम असतो. सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत या सारसांच्या घरट्यांचे संवर्धन झाल्यास सारसांच्या संवर्धनासाठी मदत होईल. आज घडीला गोंदिया जिल्ह्यातील सहा शेतकऱ्यांच्या शेतात सारसांनी घरटी तयार केली. परंतु या सहापैकी दोनच शेतकऱ्यांनी या घरट्यांची माहिती वनविभागाला किंवा निसर्गप्रेमींना दिली. चार शेतकऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सारसांची संख्या वाढायला मदत होत नाही. सारस बचावाचा संदेश आजघडीला गोंदिया जिल्हाभर फिरल्यामुळे अनेक शेतकरी सारस संवर्धनासाठी पुढे येऊ लागलेत. परंतु अजूनही अनेक शेतकरी सारस संवर्धनासाठी पाहिजे तेवढे सहकार्य करीत नाहीत.परंतु सेवा संस्था, निसर्गपे्रमी आणि वनविभागाच्या प्रयत्नांमुळे सारसांची संख्या टिकवून ठेवण्यास मदत होत आहे. सारस संवर्धनासाठी सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार, अभिजीत परिहार, शशांक लाडेकर, अंकीत ठाकूर, दुष्यंत आकरे, चेतन जसानी, कन्हैया उदापुरे सारस संवर्धनासाठी काम करीत आहेत.यावर द्यावी सारसांची माहितीज्या शेतकऱ्यांच्या शेतात सारसांचा अधिवास असेल किंवा त्यांच्या शेतात घरटी आढळल्यास सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना किंवा वनविभागाला माहिती द्यावी. मो. ९४२०५१५०४१ सावन बहेकार व ८४४६४५५६२८ अभिजीत परिहार यावर द्यावी.सारसांचा धानाला फायदाचज्या बांध्यामध्ये सारस अंडी घालते त्या बांधीतील छोट्या भागातील धानाची नासाडी होते. मात्र या धानातील सर्व किटक व परिसरातील धानातील किटक दररोज एक सारस जोडी तीन किलोच्या प्रमाणे आहार करीत असल्याने या धान पिकाला किटकनाशक लागत नाही. या बांधीतून त्या बांधीत दरवळणाºया सारसाच्या पायाने धान पिकातील ओल्या मातीचे खुंदल होत असल्याने हे पीक जोमाने भरभराटीस येते. सारस असलेल्या शेतातील धान उत्पादन ४० टक्क्याने अधिक येत असल्याची माहिती निसर्ग मित्र व सेवा संस्थेचे सावन बहेकार यांनी दिली आहे.जीवनकाळ १८ वर्षाचाधान पिकात वावरणारा हा पक्षी पाच ते सहा फूट परिघाचा असतो. याची उंची तीन फूट असते, पांढऱ्या रंगाची दोन अंडी देतात.साधारणत : २०० ते २४० ग्रॅम वजन त्या अंड्याचे असते. २८ ते ३१ दिवस अंडी उबल्यावर पिल्लं बाहेर निघतात. त्यांचा रंग पिवळसर असतो. हे पिल्लं ५० ते ६० दिवसात उडायला लागतात. या पक्ष्यांच्या जिवनकाळ १८ वर्षाचा असतो.

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्य