शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविकांच्या हक्क सन्मानासाठी संघर्ष सुरुच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 00:00 IST

अंगणवाडी सेविकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांकडे शासनाचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. चार तालुक्यातील बंद पडलेली अंगणवाडी सेविकांची भरती प्रक्रिया पुन्हा सुरु करावी आणि त्यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी लावून धरली.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : अंगणवाडी सेविका भरती सुरु करा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अंगणवाडी सेविकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांकडे शासनाचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. चार तालुक्यातील बंद पडलेली अंगणवाडी सेविकांची भरती प्रक्रिया पुन्हा सुरु करावी आणि त्यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी लावून धरली. अंगणवाडी सेविकांच्या हक्क सन्मानासाठी आपला संघर्ष सुरूच राहणार असल्याचे आ.गोपालदास अग्रवाल यांनी सांगितले.विधानसभेच्या पावसाळी अधिवेशना दरम्यान आ. अग्रवाल यांनी अंगणवाडी सेविकांच्या अनेक प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले. मात्र अंगणवाडी सेविका संदर्भात आपण चुकीचे वक्तव्य केल्याचा समज निर्माण झाल्याने अंगणवाडी सेविकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. मात्र वास्तविकता काही वेगळीच आहे. अंगणवाडी सेविकांच्या समस्या मार्गी लावण्याचा आ.अग्रवाल यांचा सदैव प्रयत्न राहिला आहे. भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचे आश्वासन दिले होते, ते त्यांनी पूर्ण करावे, अंगणवाडी सेविकांना सेवानिवृत्तीचा लाभ देण्याची मागणी केली होती.विधानसभेतील चर्चेदरम्यान काही सदस्यांनी अंगणवाडीतील पोषण आहाराच्या अनियमिततेचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर उपाय योजना म्हणून आपण सीसीटीव्ही लावण्याची मागणी केली होती. मात्र आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला.अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे कार्य फार महत्त्वपूर्ण असून त्यांच्या कार्याचा आपण सदैव सन्मान करतो. मात्र काही विघ्न संतोषी लोकांनी विधानसभेतील व्हिडिओ वायरल करुन अंगणवाडी सेविकां संदर्भात चुकीचे वक्तव्य केल्याचा आरोप करुन अंगणवाडी सेविकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. सभागृहात आणि सभागृहाबाहेर सुध्दा आपली अंगणवाडी सेविकांना न्याय मिळवून देण्याचा सदैव भुमिका राहिली. यापुढे देखील आपण अंगणवाडी सेविकांच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करु. अंगणवाडी सेविकांच्या आपल्यावरील विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल