शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
3
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
4
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
8
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
9
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
10
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
11
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
12
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
13
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
14
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
15
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
16
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
17
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
18
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
19
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
20
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती

शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा केला तीव्र निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2022 05:00 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरदचंद्र पवार यांच्या मुंबई येथील (सिल्वर ओक) निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध शनिवारी (दि. ९) जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नोंदविण्यात आला. येथील गांधी चौकातील महात्मा गांधींच्या प्रतिमेसमोर मूक आंदोलन करीत हल्ल्याचा निषेध नोंदविला. यानंतर माजी आ. राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, माजी खा. खुशाल बोपचे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे पोहचला. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरदचंद्र पवार यांच्या मुंबई येथील (सिल्वर ओक) निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध शनिवारी (दि. ९) जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नोंदविण्यात आला. येथील गांधी चौकातील महात्मा गांधींच्या प्रतिमेसमोर मूक आंदोलन करीत हल्ल्याचा निषेध नोंदविला. यानंतर माजी आ. राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, माजी खा. खुशाल बोपचे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे पोहचला. एसटी कामगाराच्या पाठीमागे सदैव उभे राहणाऱ्यांच्या घरावर हल्ला करणारे एसटीचे कामगार होऊ शकत नाही. अशी नाराजी सुध्दा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी जि. प. गटनेते सुरेश हर्षे, म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी, गोंदिया शहर अध्यक्ष अशोक शहारे, युवक काँग्रेस अध्यक्ष केतन तुरकर, युवा नेते रविकांत बोपचे, डाॅ. योगेंद्र भगत, राजू. एन. जैन, सुनील पटले, शैलेष वासनिक, विनोद हरिणखेडे, अविनाश काशीवार, प्रभाकर दोनोडे, नरेश भेंडारकर, रवी पटले, रमन उके, राजेश कापसे, प्रेम जायस्वाल, केवल बघेले, वाय. टी. कटरे, सी.के.बिसेन, नागरत्न बनसोड, अखिलेश सेठ, महेंद्र चौधरी, भृंगराज परशुरामकर, सतीश पारधी, नानू मुदलीयार, भगत ठकरानी, एकनाथ वहिले, चुटे उपस्थित होते. शनिवारी सकाळी ११  वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी  आणि कार्यकर्ते शहरातील गांधी प्रतिमा परिसरात एकत्र आले. त्यांनी राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा निषेध केला. भर उन्हात त्यांनी ठिय्या आंदोलन करून हल्ल्यामागील मास्टर माईंडला अटक करण्याची मागणी केली. 

एसटी कामगारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या घरावर केलेला हल्ला हा अंत्यत निंदनीय आहे. या हल्ल्यामागील खऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. तरच अशा घटनांची पुनर्रावृत्ती होणार नाही. - राजेंद्र जैन, माजी आमदारनेहमीच एसटी कामगारांच्या पाठीशी राहणाऱ्या खा. शरद पवार यांच्या घरावरील हल्ला हा त्यांच्या विरुध्द रचलेला कट असून या हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध नोंदवितो. अशा घटनांची पुन्हा पुनर्रावृत्ती होऊ नये यासाठी यातील हल्लेखोरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. - गंगाधर परशुरामकर, जिल्हाध्यक्ष

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस