शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघांचा मृत्यू
2
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
3
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
5
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
6
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
7
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
8
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
9
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
10
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
11
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
12
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
13
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
14
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
15
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
16
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
17
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
18
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
19
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
20
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल

दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 21:33 IST

पूर्वी दिव्यांगांना वेळेवर प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे त्यांना योग्य त्या प्रमाणात लाभ मिळत नव्हता. आता झिरो पेंडंसी अंतर्गत जिल्ह्यातील दिव्यांगांना शंभर टक्के प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता दिव्यांग बांधवाना योग्य लाभ मिळत आहे.

ठळक मुद्देराजकुमार बडोले : दिव्यांगांना नि:शुल्क सहायक उपकरण वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पूर्वी दिव्यांगांना वेळेवर प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे त्यांना योग्य त्या प्रमाणात लाभ मिळत नव्हता. आता झिरो पेंडंसी अंतर्गत जिल्ह्यातील दिव्यांगांना शंभर टक्के प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता दिव्यांग बांधवाना योग्य लाभ मिळत आहे.दिव्यांगासाठी असलेल्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करु न त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात शनिवारी (दि.१३) आयोजीत दिव्यांगांना नि:शुल्क सहायक उपकरण वितरण कार्यक्र मात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार गोपालदास अग्रवाल होते.याप्रसंगी आमदार विजय रहांगडाले, आमदार संजय पुराम, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, जिल्हा परिषद समाज कल्याण समिती सभापती विश्वजीत डोंगरे, कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती शैलजा सोनवाने प्रामुख्याने उपस्थितहोते. पुढे बोलताना बडोले यांनी, दिव्यांग बांधवांच्या विकासाठी असलेला विविध योजनेतील निधी तीन टक्क्यावरु न पाच टक्के करण्यात आला आहे. झिरो पेंडंसी अंतर्गत जिल्ह्यातील अपंग बांधवांना शंभर टक्के प्रमाणपत्र वाटपकरण्यात आले आहे.दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी प्रतिष्ठान निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे असे सांगितले. आमदार अग्रवाल यांनी, जिल्ह्यातील दिव्यांगांना नि:शुल्क सहायक उपकरणे वितरण करण्यात येत आहे हा एक स्तुत्य असल्याचे मत व्यक्त केले.आमदार रहांगडाले यांनी, शासनाच्या विविध योजना दिव्यांगांपर्यंत पोहोचल्यापाहिजे, जेणेकरु न दिव्यांग बांधवांचे जीवन सुखी होण्यास मदत होईल असे मत व्यक्त केले. प्रास्ताविक जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके यांनी मांडले. संचालन प्रदिप ढवळे यांनी केले. आभार उपायुक्त तथा जिल्हा जात पडताळणी सदस्य देवसूदन धारगावे यांनी मानले.कार्यक्रमाला समाजकल्याण सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, विभागीय निरिक्षक महेंद्र माने, दिव्यांग बांधव व त्यांचे पालक तसेच नातेवाईक मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्र मासाठी समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.दिव्यांगांना साहित्य व धनादेश वाटपकार्यक्रमात पाहुण्यांच्या हस्ते प्रतिनिधीक स्वरु पात मुकेश बडगे यांना स्मार्ट फोन, भूजल रहांगडाले यांना मोबाईल फोन, चंद्रशेखर सहारे व सुरेखा सहारे यांना श्रवणयंत्र, नेहा रहांगडाले व कुणाल आसोले यांना एम.आर.कीट, मंदीप वासनिक-स्मार्ट केन, बाबुलाल रहांगडाले-वॉकींग स्टीक, प्रमिला भांडारकर-कुबडी, अभिषेक बरडे व भुमेश्वर रहांगडाले यांना सी.पी.चेअर, अनमोल नागपुरे यांना व्हीलचेअर, विनोद बरडे, आत्माराम चुटे व ममता नागरिकर यांना ट्रायसिकल वाटप करण्यात आल्या. तसेच नामदार बडोले यांच्या हस्ते महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळांतर्गत राजु साखरे व निलकंठ सरजारे यांना प्रत्येकी पाच लक्ष रु पयांचा धनादेश वितरीत करण्यात आला.

टॅग्स :Rajkumar Badoleराजकुमार बडोलेGopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल