शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

निलंबनाच्या कारवाईनंतरही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2021 05:00 IST

राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलिनीकरण करण्यात यावे, यासह काही अन्य मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी २७ ऑक्टोबरपासून संप पुकारला आहे. यावर परिवहन मंत्र्यांनी कर्मचाऱ्यांना १ टक्के घरभाडे भत्ता व २८ टक्के महागाई भत्ता देण्याचे मान्य केले. मात्र, राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलिनीकरण हीच मुख्य मागणी पूर्ण केली नाही. यावर कर्मचारी संतापले असून त्यांनी संप सुरूच ठेवला आहे, तर या संपात ३१ ऑक्टोबरपासून गोंदिया व तिरोडा आगारातील कर्मचारी सहभागी झाले. त्यामुळे संपूर्ण फेऱ्या रद्द आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ऐन दिवाळीच्या हंगामात राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांना घेवून मागील १३ दिवसांपासून संप पुकारला आहे. महांमडळ आणि न्यायालयाच्या निर्देशानंतरही कर्मचाऱ्यांनी संप मागे न घेतल्याने महामंडळाने गोंदिया आणि तिरोडा आगारातील २० कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. पण यानंतरही संपकरी कर्मचाऱ्यांनी माघार घेतली नसून ते आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे चित्र आहे. राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलिनीकरण करण्यात यावे, यासह काही अन्य मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी २७ ऑक्टोबरपासून संप पुकारला आहे. यावर परिवहन मंत्र्यांनी कर्मचाऱ्यांना १ टक्के घरभाडे भत्ता व २८ टक्के महागाई भत्ता देण्याचे मान्य केले. मात्र, राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलिनीकरण हीच मुख्य मागणी पूर्ण केली नाही. यावर कर्मचारी संतापले असून त्यांनी संप सुरूच ठेवला आहे, तर या संपात ३१ ऑक्टोबरपासून गोंदिया व तिरोडा आगारातील कर्मचारी सहभागी झाले. त्यामुळे संपूर्ण फेऱ्या रद्द आहेत.ऐन सणासुदीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी संप केल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांची सर्वाधिक गैरसोय होत आहे. यामुळे त्यांना काळीपिवळी व इतर खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंडदेखील सहन करावे लागत आहे.  रेल्वे गाड्यात वाढली वेटिंग - मागील १३ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने बसेस पूर्णपणे ठप्प आहेत. तर दिवाळी आणि भाऊबीजनिमित्त बाहेरगावी ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. बसेस अभावी रेल्वे गाड्यांमधील गर्दी वाढली आहे. रेल्वे गाड्यांमध्ये चारशे ते पाचशेपर्यंत वेटिंग लिस्ट आहे. आरक्षित डब्ब्यांमध्ये सुद्धा प्रवाशांची गर्दी वाढली असून आरक्षण करून जाणाऱ्या प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तरी लोकल पॅसेंजर सुरू नाही- रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांची गर्दी वाढली असली तरी रेल्वे विभागाने केवळ विशेष गाड्याच सुरू ठेवून प्रवाशांची लूट कायम ठेवली आहे. लोकल आणि पँसेजर गाड्या सुरू करण्यासंदर्भात अद्यापही कुठला निर्णय रेल्वे विभागाने घेतला नाही. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना याचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.खासगी वाहनांना सुगीचे दिवस - बसेस पूर्णपणे बंद असल्याने काळीपिवळी, खासगी ट्रॅव्हल्समधील गर्दीत वाढ झाली आहे. त्यांनी या संधीचा फायदा घेत तिकीट दरात सुद्धा ५० ते १०० रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे खासगी वाहनांना सुगीचे दिवस आल्याचे चित्र आहे. याचा फटका मात्र प्रवाशांना बसत असल्याने मेघराज मेश्राम, दिवाकर चुटे, देवीदास मोहुर्ले या प्रवाशांनी यावर नाराजी व्यक्त केली.

 

टॅग्स :state transportएसटीStrikeसंप