शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा तिढा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2021 05:00 IST

गोंदिया जिल्ह्यात गोंदिया आणि तिरोडा हे दोन आगार असून या दोन्ही एकूण १२० बसेस आहेत. तर ३४५ वर कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांनी अद्यापही संप मागे घेतलेला नाही. त्यामुळे या दोन्ही आगारांतून एकही बस धावली नाही. या आगारातून दररोज एसटीच्या दररोज ४१३ बसफेऱ्या होत होत्या. मात्र मागील महिनाभरापासून बससेवा ठप्प असल्याने या दोन्ही आगारांचे दररोजचे ९ लाख रुपयांचे नुकसान होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : एसटी महामंडळाचे जोपर्यंत विलीनीकरण केले जात नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा गोंदिया आणि तिरोडा आगारात संप सुरूच असल्याने एसटीचे चाके रुतलेलीच आहेत. संपामुळे या दोन्ही आगारांच्या दररोजच्या ४१३ बसफेऱ्या रद्द झाल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी मागील महिनाभरापासून त्यांच्या मागण्यांना घेऊन संप सुरू केला आहे. शासनाने एसटी कर्मचाऱ्यांना ४५ टक्के पगारवाढ दिल्यानंतरसुध्दा कर्मचारी एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे काही तुरळक आगार वगळता इतर ठिकाणी एसटीची सेवा बंद आहे. गोंदिया जिल्ह्यात गोंदिया आणि तिरोडा हे दोन आगार असून या दोन्ही एकूण १२० बसेस आहेत. तर ३४५ वर कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांनी अद्यापही संप मागे घेतलेला नाही. त्यामुळे या दोन्ही आगारांतून एकही बस धावली नाही. या आगारातून दररोज एसटीच्या दररोज ४१३ बसफेऱ्या होत होत्या. मात्र मागील महिनाभरापासून बससेवा ठप्प असल्याने या दोन्ही आगारांचे दररोजचे ९ लाख रुपयांचे नुकसान होत आहे. तर महिनाभरापासून बसेस एकाच ठिकाणी उभ्या असल्याने त्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या खर्चातसुध्दा वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

खासगी वाहनांचे वाढले बुकिंग -तुळशी विवाहानंतर लग्नसराईला सुरुवात होते. कोरोनामुळे मागील दोन वर्षे लग्न सोहळ्याला बऱ्याच प्रमाणात ब्रेक लागला होता. त्यातच आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुुळे लग्न सोहळे लवकर आटोपले जात आहेत. एसटीची सेवा बंद असल्याने खासगी वाहनांचे बुकिंग वाढल्याचे चित्र आहे.ग्रामीण भागातील नागरिकांचा पायी प्रवास - जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांची मदार ही बऱ्याच प्रमाणात एसटीवर अवलंबून असते. मात्र बसेस बंद असल्याने आणि प्रवासाचे दुसरे साधन उपलब्ध नसल्याने त्यांना आठ ते दहा किमीचा प्रवास पायीच करावा लागत आहे. तर काळी-पिवळी वाहनचालकांनी तिकिटाचे दर वाढविल्याने याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान - मागील महिनाभरापासून बससेवा बंद असल्याने शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना याचा फटका बसत आहे. खासगी वाहनाने नियमित प्रवास करणे शक्य नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. एसटी कर्मचाऱ्यांवर आज होणार कारवाई- संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिल्यानंतरही ते कामावर रुजू झाले नाहीत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर सोमवारी निलबंनाची कारवाई केली जाणार असल्याचे विभागीय नियंत्रकांनी सांगितले.

 

टॅग्स :state transportएसटीStrikeसंप