शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तणावग्रस्त पोलीस कर्मचाऱ्याची स्वत: गोळी घालून केली आत्महत्या

By नरेश रहिले | Updated: November 17, 2024 20:49 IST

आत्महत्येपूर्वी बहिणीला केला मॅसेज: त्या मॅसेजमध्ये आत्महत्येला कारणीभूत असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची नावे

नरेश रहिले, गोंदिया: पोलीसाची ड्युटी करतांना तणावात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:च्या एसएलआर रायफने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली. राकेश पांडुरंग भांडारकर (३७) रा. पदमपूर ता. आमगाव जि. गोंदिया असे गोळी झाडून आत्महत्या करणाऱ्या पोलीस शिपायाचे नाव आहे.

गोंदिया पोलीस दलात कार्यरत पोलीस शिपाई राकेश पांडुरंग भांडारकर (३७) यांची ड्युटी बिरसी विमानतळ येथे आहे. मागील दोन ते तीन वर्षापासून बिरसी विमानतळावर कार्यरत असलेल्या राकेश भांडारकर यांची ड्युटी बिरसी विमानतळावर शांततेत सुरू होती. १७ नोव्हेंबर रोजी पाईंटवर ड्युटी करतांना त्याला त्याचे तेथील अधिकारी व काही सहकारी त्याला मानसिक त्रास देत होते. पाईंटवर ड्युटी असतांना त्याला इकडे-तिकडे पाठवित होते. त्याला वारंवार मानसिक त्रास देत असल्याने तणावात आलेल्या राकेश भांडारकर याने स्वत: जवळील असलेली एसएलआर रायफने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.आत्महत्येपूर्वी बहिणीला टाकला मॅसेज

राकेश भांडारकर यांची बहिणी अरूणा भांडारकर ही देखील गोंदिया पोलीस दलात पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. राकेशने दुपारी २:४८ वाजता आपल्या बहिणीच्या मोबाईलवर एक मॅसेज टाकला. रिजर्व लोक असतांना मला पाईंट वरून बोलावत आहेत. माझ्या मरणाला कारणीभूत हे तीन लोक आहेत असा मॅसेज टाकून त्या मॅसेजमध्ये एका पीएसआयसह तिघांचे नाव टाकण्यात आले आहेत.फोन आल्यावरच कळली मृत्यूची बातमी

आपल्या कामात व्यस्त असलेल्या अरूणा भांडारकर यांनी मोबाईलला हात न लावल्यामुळे त्यांना भावाचा मॅसेज मिळाला नाही. सायंकाळ होताच त्यांच्या मोबाईलवर फोन आल्यानंतरच राकेशच्या मृत्यूची बातमी कळाली. लगेच त्यांनी बिरसी विमानतळाच्यादिशेने धाव घेतली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी