शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

वीज व्यवस्थेचे बळकटीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 23:49 IST

दर्जेदार व अखंडित सेवा देण्यासाठी महावितरणने दीनदयाल ग्राम ज्योती योजनेतून हे काम सुरू केले असून यासाठी ९६.०८ कोटींचा मंजूर करण्यात आला आहे.

ठळक मुद्देदीनदयाल ग्राम ज्योती योजना : उपकेंद्र, क्षमतावाढ, वाहिन्यांचा समावेश

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दर्जेदार व अखंडित सेवा देण्यासाठी महावितरणने दीनदयाल ग्राम ज्योती योजनेतून हे काम सुरू केले असून यासाठी ९६.०८ कोटींचा मंजूर करण्यात आला आहे.दिवसेंदिवस वाढत चाललेली वीजेची मागणी लक्षात घेता भविष्यात सध्याची यंत्रणा कमकुवत पडून त्याचा फटका ग्राहकांना सहन करावा लागणार आहे. त्यामुळे यावर तोडगा म्हणून आतापासूनच आपण सज्ज रहावे या उद्देशातून महावितरणने वीज व्यवस्थेच्या बळकटीकरणाचे काम होती घेतले आहे. वाढती लोकसंख्या, त्यानुसार वाढते क्षेत्रफळ व वाढत चाललेली विजेची मागणी यामुळे आजची यंत्रणा एवढा भार सहन करण्यात कोठेतरी कमी पडू लागली आहे. अशात कित्येकदा वीज पुरवठा खंडित होणे यासह अन्य काही समस्या निर्माण होतात. सर्वसामान्य माणसाला वीज वितरणातील या समस्यांबाबत माहिती नसते. मात्र आज असलेल्या व्यवस्थेवर वाढत चाललेला भार या मागचे कारण ठरत आहे.अशात ग्राहकांना अखंडित व दर्जेदार सुविधा देण्यासाठी महावितरणने भविष्यातील बदलती परिस्थिती लक्षात घेत आतापासूनच वीज व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी सुरूवात केली आहे.यासाठी गोंदियाला दीनदयाल ग्राम ज्योती योजनेतून ९६.०८ कोटींचा निधी देण्यात आला आहे.या योजनेतून महावितरण भविष्यातील चित्राचा अंदाज बांधून त्यानुसार आजच्या व्यवस्थेत आवश्यक ते बदल करवून घेत उद्यासाठी त्यांना सज्ज करीत आहेत.यात विविध प्रकारच्या कामांचा समावेश असून ही कामे होणार असल्याने उद्याच्या परिस्थितीसाठी वीज वितरण कंपनी तत्पर राहणार आहे.त्यांच्या घरात येणार ‘ज्योती’आजही ज्याच्या घरात वीज पोहोचलेली नाही अशा दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना त्यांच्या हक्काचे कनेक्शन देण्याची तरतूद दीनदयाल ग्राम ज्योती योजनेत करण्यात आली आहे. आजही कित्येक कुटुंबांची कनेक्शन घेण्याची परिस्थिती नसल्याने ते अंधारातच आपले जीवन जगत आहेत. मात्र त्यांच्याही घरात वीजेचा प्रकाश व्हावा हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. यासाठी जिल्ह्याला १७ हजार ३८७ कनेक्शनचे टार्गेट देण्यात आले आहे. यात संबंधित लाभार्थी कुटुंबाला पूर्ण फिटिंग करून दिली जाणार आहे. यासाठी त्याला एकही रूपया खर्च करावयाचा नसून हे संपूर्ण काम वीज वितरण कंपनी करून देणार आहे.वाहिन्यांचे विलगीकरणया योजनेंतर्गत वाहिन्यांचे विलगीकरण केले जाणार असून यात १३०८.५४ कीमी. उच्चदाब व २१०.१ किमी.लघुदाब वाहिनीची तरतूद करण्यात आली आहे. शिवाय ३८७ विद्युतरोहीत्रांचीही तरतूद करण्यात आली आहे.उपकेंद्रांची क्षमतावाढआजघडीला ज्या उपकेंद्रांवर जास्त भार येत आहे अशा उपकेंद्रांची क्षमतावाढ या योजनेंतर्गत केली जाणार आहे. यामध्ये तिरोडा तालुक्यातील परसवाडा व एकोडी, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी व देवरी तालुक्यातील देवरी येथीलच उपकेंद्राची क्षमता वाढविली जाणार आहे. सध्या हे केंद्र ५ एमव्हीए क्षमतेचे असून ते त्यांची १० एमव्हीए पर्यंत क्षमता वाढविली जाणार व हे काम सुरू आहे.आठ उपकेंद्रांना मंजुरीया योजनेंतर्गत जिल्ह्यात आठ नवीन उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहेत. यात, गोंदिया तालुक्यात मुंडीपार व काटी, गोरेगाव तालुक्यात मोहाडी, तिरोडा तालुक्यात मुंडीकोटा (मेंढा), देवरी तालुक्यात मुल्ला, सडक-अर्जुनी तालुक्यात खोबा, आमगाव तालुक्यात ठाणा तर सालेकसा तालुक्यात तिरखेडी येथे हे उपकेंद्र तयार केले जाणार आहेत. यासाठी निविदा प्रक्रिया झाली असून कार्यादेश देण्यात आले आहेत. तर मोहाडी व मुल्ला येथील काम सुरू आहे.