शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

कार्यविस्तार योजनेतून पक्ष संघटनेला बळकट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2017 01:03 IST

भारतीय जनता पक्षाच्या सर्वच वर्गातील कार्यकर्त्यांना प्रशिक्षीत करायचे आहे. कार्यविस्तार योजनेच्या माध्यमातून ...

रामदास आंबटकर : कार्यविस्तार योजनेची बैठक लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भारतीय जनता पक्षाच्या सर्वच वर्गातील कार्यकर्त्यांना प्रशिक्षीत करायचे आहे. कार्यविस्तार योजनेच्या माध्यमातून विस्तारक कार्यकर्त्यांना दिवसभरातून ठरविलेल्या कामाप्रमाणे १५ दिवस कार्य करायचे आहे. सदस्यता अभियानातून ज्यांना आपण सदस्य केले आहे त्यांच्याशी भेटणे व नवीन सदस्य बनवायचे असून या माध्यमातून पक्ष संघटनेला बळकट करण्याचे कार्य करायचे आहे, असे प्रतिपादन प्रदेश सरचिटणीस व पं.दिनदयाल उपाध्याय कार्यविस्तार योजनेचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक डॉ. रामदास आंबटकर यांनी केले. आमगाव येथील फार्मसी कॉलेज मध्ये आयोजित कार्यविस्तार योजनेतील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांच्या अध्यक्षतेत आयोजित या बैठकीत प्रामुख्याने विस्तारक योजनेचे विदर्भ सहसंयोजक आशीष वांदिले, आमदार विजय रहांगडाले, आमदार संजय पुराम, विस्तारक योजनेचे जिल्हा संयोजक माजी आमदार केशव मानकर, माजी आमदार खोमेश रहांगडाले, माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, गोंदियाचे नगराध्यक्ष अशोक इंगळे, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, जिल्हा संघटन महामंत्री विरेंद्र अंजनकर, जिल्हा महामंत्री रविकांत बोपचे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना आंबटकर यांनी, मागील लोकसभा निवडणुकीत देशातील ८१ कोटी मतदारांपैकी ५५ कोटी मतदारांनी मतदान केले. यात १७ कोटी मते भाजपला मिळाली असून २८३ लोकसभेचे प्रतिनिधी निवडून आले. येणाऱ्या काळात या स्थितीला अधीक बळकट करण्याकरीता युवा वर्गावर मोठी जबाबदारी आहे. भाजपच्या ११ कोटी सदस्यांपैकी राज्यात एक कोटी सहा लाख सदस्य आहेत. कार्यविस्तार योजनेत सर्वानाच वेळ द्यायचे असून स्वत: राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह १५ दिवस पाच राज्यांत प्रत्येकी तीन दिवस बुथवर राहणार आहेत. या काळात प्रत्येक विस्तारक कार्यकर्त्यांनी नियोजनाप्रमाणे कार्य करुन आपली दैनंदिन माहिती लिहून १५ दिवसानंतर ती जमा करावी. यावेळी त्यांनी १५ दिवसांच्या कार्याचे नियोजन संदर्भात चर्चा करून आढावा घेतला व मार्गदर्शन केले. तसेच आजीवन सहयोग निधी संदर्भात आढावा घेतला. आशिष वांदिले व हेमंत पटले यांनीही योजनसंदर्भात मार्गदर्शन केले. संचालन जिल्हा संघटन महामंत्री अंजनकर यांनी केले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.