शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
2
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
3
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
4
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
5
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
6
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
7
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
8
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
9
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
10
सामुद्रिक शास्त्र: शरीराच्या कुठल्या भागावर 'तिळ' आहे, त्यानुसार समुद्र शास्त्र सांगते तुमचे भाकीत!
11
​​​​​​​Kotak Mahindra Bank Success Story: २ खोल्यांपासून झाली सुरुवात, आज ४ लाख कोटींचा टर्नओव्हर; वाचा कोटक महिंद्रा बँकेची अनटोल्ड स्टोरी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
13
VIDEO : तिकडं स्टार्कचा अप्रतिम फ्लाइंग कॅच; इकडं नेटकऱ्यांनी KL राहुलची उडवली खिल्ली; कारण...
14
Astro Tips: कुंडलीतील गुरुचे स्थान निश्चित करते, तुम्हाला संसार सुख मिळणार की वैराग्य!
15
भयंकर! चालत्या कारला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी लोकांनी मारल्या उड्या
16
सॅलरी कमी होणार, PF-ग्रॅच्युईटीमध्ये वाढ होणार? नोकरी करणाऱ्या लोकांसाठी अनेक गोष्टी बदलणार
17
जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये तडजोडी, आयात उमेदवार अन् फोडाफोडी; अजितदादांच्या ‘ताकदीच्या मर्यादा’ उघड
18
Video - "मी तुम्हाला आणि तुमच्या मुलीला मारून टाकेन"; प्रिन्सिपलची जीवे मारण्याची धमकी
19
‘या’ सरकारी बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या शर्यतीत दिग्गज बँक; अनेक दिवसांपासून सुरू आहे खासगीकरणाचा विचार
20
Smriti Mandhana Haldi Ceremony : टीम इंडियाच्या 'राणी'च्या हळदी समारंभात संघातील साऱ्याजणींचा झिंगाट डान्स
Daily Top 2Weekly Top 5

भेदभाव विसरून पक्ष बळकट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 00:06 IST

पक्ष जेवढा बळकट होईल तेवढेच शासनाला बळ मिळेल आणि शासन आवश्यक ते सर्व निर्णय घेऊ शकेल. याचा पक्षासह सर्वसामान्य नागरिकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लाभ मिळेल. म्हणून पदाधिकाऱ्यांनी आपसांतील मतभेद विसरुन पक्षाला बळकट ठेवण्यासाठी एकमेकांना सहकार्य करण्याला महत्व द्यावे, ...

ठळक मुद्देसंजय पुराम : पदाधिकाऱ्यांची प्रशिक्षण कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : पक्ष जेवढा बळकट होईल तेवढेच शासनाला बळ मिळेल आणि शासन आवश्यक ते सर्व निर्णय घेऊ शकेल. याचा पक्षासह सर्वसामान्य नागरिकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लाभ मिळेल. म्हणून पदाधिकाऱ्यांनी आपसांतील मतभेद विसरुन पक्षाला बळकट ठेवण्यासाठी एकमेकांना सहकार्य करण्याला महत्व द्यावे, असे आवाहन आ. संजय पुराम यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना केलेभारतीय जनता पक्षाच्या सालेकसा तालुका मंडळातील प्रमुख पदाधिकारी, बुथप्रमख, शक्तीकेंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख व प्रमुख महिला, आघाडी पदाधिकारी तसेच प्रमुख कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण हलबीटोला येथील अर्धनारेश्वरालयाच्या सभागृहात घेण्यात आले. यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.उद्घाटन आ. संजय पुराम यांच्या हस्ते, भाजप तालुका अध्यक्ष परसराम फुंडे यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. मार्गदर्शक समन्वयक म्हणून काशीराम हुकरे व उमेश मेंढे तर पाहुणे म्हणून शंकर मडावी, माजी सभापती देवराज वडगाये, बाबुलाल उपराडे, खेमराज लिल्हारे, माजी जि.प. महिला बालकल्याण सभापती सविता पुराम, तालुका महिला आघाडी प्रमुख कल्याणी कटरे, पं.स. सदस्य प्रतिभा परिहार, प्रमिला दसरिया, जया डोये, माजी उपसभापती राजकुमार विश्वकर्मा, मनोज विश्वकर्मा व इतर मान्यवर उपस्थित होते. पदाधिकाºयांचे प्रशिक्षण वर्ग सत्रानुसार घेऊन वेगवेगळ्या विषयानुरुप पदाधिकाऱ्यांना पक्ष संघटनेबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.आ. पुराम यांनी, आजघडीला भारतीय जनता पक्ष देशाचाच नव्हे तर संपूर्ण जगाचा सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरला आहे. देशाच्या प्रत्येक राज्यात पक्षाचा झपाट्याने विस्तार होत आहे. अशात पक्षाचे बळकटीकरण करुन जनसामान्यांच्या हितासाठी काम करावे. पक्ष कार्यकर्त्यांनी मतभेद विसरुन समर्पित भावनेने काम केल्याशिवाय एवढे मोठे यश मिळणे शक्य नव्हते. भाजपाप्रति जनसामान्यांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे. हा विश्वास टिकवून ठेवण्याची जबाबदारी पक्ष पदाधिकाऱ्यांच्या खांद्यावर असल्याचे सांगीतले.या वेळी पक्षात सतत कर्मठतेने कार्य करणारे अजय वशिष्ठ, गुणवंत बिसेन, इसराम बहेकार, सुनील अग्रवाल, आर.डी. रहांगडाले, संजू कटरे, रमसुला चुटे, मनोज बोपचे, दिनेश शर्मा, हेमराज सुलाखे तसेच अनेक आजी-माजी सरपंच, पं.स. , जि.प. सदस्य, गाव पातळीवरील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. संचालन राजेंद्र बडोले यांनी केले. आभार मनोज बोपचे यांनी मानले.

टॅग्स :BJPभाजपा