शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

शहरातील रस्त्यांना मलम्याचा मुलामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 21:34 IST

अवघ्या शहरातीलच रस्त्यांची दुर्गत झाली असून त्यावर मोठाले खड्डे पडले आहेत. यामुळे शहरवासी चांगलेच त्रस्त आहेत. विशेष म्हणजे, त्यांचा त्रास कमी व्हावा यासाठी या खड्डयांत मलमा टाकला जात आहे. हा प्रयोग मात्र शहरवासीयांच्या त्रासात भर घालणारा ठरत आहे.

ठळक मुद्देखड्डे भरण्यासाठी प्रयोग : शहरवासीयांच्या त्रासात भर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अवघ्या शहरातीलच रस्त्यांची दुर्गत झाली असून त्यावर मोठाले खड्डे पडले आहेत. यामुळे शहरवासी चांगलेच त्रस्त आहेत. विशेष म्हणजे, त्यांचा त्रास कमी व्हावा यासाठी या खड्डयांत मलमा टाकला जात आहे. हा प्रयोग मात्र शहरवासीयांच्या त्रासात भर घालणारा ठरत आहे. मलम्यामुळे रस्त्यांची स्थिती अधिकच खराब झाली असून त्यावरून वाहतूक करणे अधिकच धोकादायक ठरत आहे.शहरातील रस्त्यांना ग्रहण लागले असून अवघ्या शहरातीलच रस्त्यांची स्थिती गंभीर आहे. एखाद्या गावातील रस्त्यांपेक्षाही दयनीय अवस्था शहरातील रस्त्यांची झाली आहे. अवघे रस्तेच उखडल्याचे दिसत असताना कित्येक रस्त्यांवर मोठाले खड्डे पडले आहेत. रस्त्यांच्या दुर्गतीमुळे पावसाळ््यात तर शहरवासीयांना आपला जीव मुठीत घेऊनच घराबाहेर निघावे लागते अशी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र उपाय नसल्यामुळे शहरवासीयांना आहे त्या स्थितीशी जुळवून घ्यावे लागत आहे.रस्त्यांवरील या खड्ड्यांना भरण्यासाठी रस्त्यांची दुरूस्ती करण्याचे सोडून सध्या त्यावर मलम्याचा मुलामा चढविला जात आहे. गिट्टीचा कच्चा मसाला तयार करून उखडलेल्या रस्त्यांवर टाकणे किंवा एखाद्या बांधकामातील मलमा खड्यांत टाकून त्यांना भरण्याचे काम नगर परिषद करून आपले सौजन्य दाखविते. शहरवासीयांचा त्रास कमी होणार हा यामागचा हेतू दिसून येतो. मात्र या प्रयोगामुळे शहरवासीयांचा त्रास जास्तच वाढला आहे. या मलम्यातील विटांचे तुकडे किंवा कॉंक्रीटमुळे जास्तच झटके खात ये-जा करावी लागत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.विशेष म्हणजे, काही ठिकाणी तर मसाल्यामुळे चिखल झाला असून तेथून वाहन काढणेही जिकरीचे झाले आहे. रस्त्यांमुळे झटके खात शहरवासीयांचे आता कंबरडे मोडण्याची पाळी आली आहे. मात्र येथील नेतेमंडळी शहर बदलत चालल्याचे बोलत आहेत. एखाद्या खेड्याच्या तुलनेत गोंदिया शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. मात्र यावर तोडगा काढणे सोडून मलमा टाकून हात वर करण्याचे प्रकार दरवर्षी केले जात आहेत.तेवढ्या पैशांत एखादा रस्ता तयार कराशहरातील रस्त्यांवरील खड्डे भरण्याच्या कामावर नगर परिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग लहान-सहान कामे काढून पैसा ओततो. काही दिवसांनी समस्या तशीच होते. यात पैसा मात्र वाया जातो. त्यामुळे खड्डे भरण्याच्या कामावर पैसा खर्च करण्यापेक्षा तेवढ्याच पैशांत एखादा रस्ताच तयार करून टाका अशा प्रतिक्रीया आता शहरवासी देत आहेत.मामा चौकात झटकेच झटकेशहरातील मामा चौक ते विवेकानंद कॉलनीच्या रस्त्यावरून वाहन चालविणे आज अत्यंत कठीण काम झाले आहे. मोठाल्या खड्यांमुळे येथे लोक पडत आहेत तसेच झटक्यांनी त्रस्त झाले आहेत. अशात नगर परिषदेने खड्डे भरण्यासाठी मलमा टाकला आहे. काही दिवस या मलम्याचे मोठे ढिगारच रस्त्यावर पडून होते. आता मलमा खड्यात टाकण्यात आला असून त्यामुळेच आणखीच डोकेदुखी वाढली आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षा