शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसाचा ३०० एकरातील पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 00:08 IST

जिल्ह्यात रविवारी दुपारच्या सुमारास झालेल्या वादळी पावसाचा रब्बी पिके आणि फळाबागांना सर्वाधिक फटका बसला. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार वादळी पावसामुळे तिनशे एकरमधील पिकांचे नुकसान झाल्याची बाब पुढे आली आहे.

ठळक मुद्देफळबागांचे सर्वाधिक नुकसान : कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज

आॅनलाईन लोकमतगोंदिया : जिल्ह्यात रविवारी दुपारच्या सुमारास झालेल्या वादळी पावसाचा रब्बी पिके आणि फळाबागांना सर्वाधिक फटका बसला. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार वादळी पावसामुळे तिनशे एकरमधील पिकांचे नुकसान झाल्याची बाब पुढे आली आहे. सर्वेक्षणानंतर या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.हवामान विभागाने रविवारी (दि.१२) विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पाऊस व गारपिटीचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज खरा ठरला. विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात रब्बी पिके आणि फळाबागांचे नुकसान झाले. जिल्ह्यात रब्बी हंगामात धान, हरभरा, गहू या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. पावसाअभावी मागील खरीप हंगामात शेतकºयांना हाती आलेले पिके गमावावी लागली. परिणामी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. खरीपात झालेले नुकसान रब्बी पिकाची लागवड करुन भरुन काढू अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र रविवारी झालेल्या वादळी पावसाचा गहू, हरभरा, धान या पिकांना फटका बसल्याने त्यांच्या आशेवर पाणी फेरल्या गेल्या. वादळी पावसामुळे शेतातील गव्हाचे पीक झोपून गेले. जिल्ह्यात यंदा २४ हजार हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड करण्यात आली आहे. यात गहू, धान, लाखोळी, हरभरा, मक्का या पिकांचा समावेश आहे. तीनशे ते चारशे एकरवर पपई, अ‍ॅपल बोर यांच्या फळबागा आहेत. वादळी पावसामुळे फळे गळून पडल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. कृषी विभागाच्या प्राथमिक सर्वेक्षणात जिल्ह्यातील तिनशे एकरातील पिकांचे नुकसान झाल्याची बाब पुढे आली. राज्याचे कृषी मंत्री पांडूरंग फुंडकर यांनी कृृषी विभागाला वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर कृषी विभागाने सोमवारपासून (दि.१३) सुरूवात केली आहे. आठवडाभरात नुकसानीचा अहवाल शासनाला सादर केला जाणार असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.९६ घरांची पडझडजिल्ह्यात रविवारी (दि.१२) झालेल्या वादळी-पावसामुळे ९६ घरांची पडझड झाली. अनेक ठिकाणी गुरांचे गोठे व घरावरील टिनाचे छप्पर उडाल्याची माहिती आहे. जिल्हा आपत्तीनिवारण विभागाने नुकसानीचे सर्वेक्षण करण्यास सुरूवात केली असल्याचे या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.