शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रोटेशन थांबल्याने धान खरेदीतील घोळ उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2022 22:25 IST

नेमका कोणत्या हंगामातील धान किती धान खरेदी केंद्राकडे शिल्लक आहे, हे समजण्यास मार्ग नाही. एकंदरीत खरेदीच्या रोटेशनमुळे धान केंद्रावर दिसत होते; पण यंदा हे रोटेशन थांबल्याने धान खरेदीतील मोठे घबाड उघडकीस आले आहे. याची कबुली खुद्द याच विभागाचे काही अधिकारी देत आहेत. त्यामुळेच नुकताच जिल्ह्यातील सहा खरेदी केंद्रांवरून ४५ हजार क्विंटल धान गायब असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या सहा शासकीय धान खरेदी केंद्रांवरील तब्बल ४५ हजार क्विंटल धान गायब असल्याचा बाब  नुकतीच उघडकीस आली. त्याचबरोबर या घोटाळ्यातील अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या असून, धान खरेदी केंद्रांवरील धानाची भरडाईसाठी वेळेत उचल होत नसल्याने धानाची मोठ्या प्रमाणात परस्पर विल्हेवाट लावली जात आहे. त्यामुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या धानावर काही केंद्र चालक डल्ला मारत असल्याचे पुढे आले आहे. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत हमीभावाने सहकारी संस्थांच्या शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. या खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाची राईस मिलर्ससह करार करून भरडाई केली जाते. त्यानंतर भरडाई करून हा तांदूळ शासनाकडे जमा केला जातो. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन धानाची भरडाई करण्यासाठी राईस मिलर्ससह करार करते. त्यानंतर त्यांना खरेदी केंद्रावरील धानाची  उचल करण्यासाठी डीओ देते; पण मागील तीन चार वर्षांपासून शासन आणि राईस मिलर्स यांच्यात संघर्ष सुरू आहे. राईस मिलर्सला भरडाईचा दर वाढवून देण्यात आला नाही. तर वाहतूक भाड्याचे कोट्यवधी रुपये शासनाकडे थकले होते. परिणामी धान खरेदी केंद्रावरून धानाची वेळेत उचल झाली नाही. तीन-चार वर्षांपासून हीच समस्या कायम आहे. त्यामुळे काही धान खरेदी केंद्रांनी याचा फायदा उचलला. खरेदी केलेल्या धानाची परस्पर विल्हेवाट लावली. तर काही खरेदी केंद्रांनी केवळ कागदावरच धान  खरेदी केली असल्याची बाब राईस मिलर्स धानाची उचल करण्यासाठी गेल्यानंतर स्पष्ट झाली. खरिपात खरेदी केलेला धान  रब्बीत आणि रब्बीत खरेदी केलेल्या धानाची खरिपात उचल केली जात आहे. त्यामुळे नेमका कोणत्या हंगामातील धान किती धान खरेदी केंद्राकडे शिल्लक आहे, हे समजण्यास मार्ग नाही. एकंदरीत खरेदीच्या रोटेशनमुळे धान केंद्रावर दिसत होते; पण यंदा हे रोटेशन थांबल्याने धान खरेदीतील मोठे घबाड उघडकीस आले आहे. याची कबुली खुद्द याच विभागाचे काही अधिकारी देत आहेत. त्यामुळेच नुकताच जिल्ह्यातील सहा खरेदी केंद्रांवरून ४५ हजार क्विंटल धान गायब असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. 

चौकशीत वाढणार केंद्राची संख्या शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाची परस्पर विल्हेवाट लावली जात असल्याची बाब आता लपून राहिलेली नाही. यामुळे शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावला जात आहे. याची आता चौकशी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने सुरू केली असून, खरेदीपेक्षा कमी धान आढळलेल्या केंद्रांना नोटीस देण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे घोळ असणाऱ्या केंद्रांची संख्या वाढणार आहे. 

राजकीय पाठबळ चौकशीत ठरतेय अडसर - जिल्ह्यातील बरेच शासकीय धान खरेदी केंद्रही कुठल्या ना कुठल्या पक्षाच्या नेत्याची किंवा नातेवाइकांची अथवा कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे या केंद्रावरील घोळ पुढे आल्यानंतर कारवाई टाळण्यासाठी राजकीय दबाव आणला जात असल्याने या केंद्रांना पाठबळ मिळत असल्याने कारवाईत अडसर निर्माण होत असल्याची बाब आता लपून राहिलेली नाही.

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डfraudधोकेबाजी