शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गावातील अवैध दारु विक्री बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 00:01 IST

गावात मागील काही दिवसांपासून अवैध दारु विक्री जोरात सुरू आहे. परिणामी गावातील तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. तर अनेक कर्ते पुरूष दारुच्या आहारी गेल्याने अनके कुटुंब उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

ठळक मुद्देगावकऱ्यांची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्करावणवाडी : गावात मागील काही दिवसांपासून अवैध दारु विक्री जोरात सुरू आहे. परिणामी गावातील तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. तर अनेक कर्ते पुरूष दारुच्या आहारी गेल्याने अनके कुटुंब उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.अवैध धंद्यांमध्ये वाढ झाल्याने गावातील वातावरण कलुषीत होत आहे. त्यामुळे गावातील अवैध दारु विक्री व अवैध धंदे बंद करण्यात यावे. अशी मागणी गावातील महिलांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. गोंदिया तालुक्यातंर्गत येणाऱ्या रावणवाडी येथे पोलीस स्टेशन आहे. मात्र यानंतर मागील काही दिवसांपासून गावातील अवैध धंद्यामध्ये वाढ झाली आहे. गावात दारुची अवैध विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्याना दारुचे व्यसन जडत असल्याचे चित्र आहे. मोल मजुरी करुन जगणाऱ्या कुटुंबांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. घरातील कर्ता पुरुष दारुच्या व्यसनाच्या आहारी गेल्याने त्यांचे कुटुंब उध्दवस्त होण्याच्या मार्गावर आहे. तर गावातील भांडण तंट्यांमध्ये वाढ झाली आहे. पोलिसांना याबाबत वांरवार निवेदन देऊन सुध्दा अवैध दारु विक्रीला आळा बसला नसल्याचा आरोप महिलांनी केला आहे. गावात पूर्णपणे दारु बंदी करण्यासाठी विशेष सभा बोलाविण्याची मागणी प्रशासनाकडे महिलांनी केली आहे. तसेच गावातील अवैध दारु विक्री बंद न केल्यास या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महिलांनी जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे,जिल्हा पोलीस अधीक्षक हरिष बैजल, रावणवाडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.शिष्टमंडळात सरपंच सुजित येवले, तिलकप्रसाद भगत, जैपाल पारधी, हिरा सोनवाने, ममता बिसेन, आचल बिसेन, वर्षा बिसेन,छबू बिसेन व गावातील महिलांचा समावेश आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी