ऑनलाईन लोकमतगोंदिया : शहरात गुन्हेगारी, चोरी, वाटमारी आदी घटनात दिवसेंदिवस वाढतच आहे. यावर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी संपात व्यक्त केला असून वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवर तत्काळ आळा घालून ठोस पाऊल उचलण्यात यावे, अशा आशयाचे पत्र खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या मार्गदर्शनात देण्यात आले.राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने हे निवेदन पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांच्यासह शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोहर दाभाडे व रामनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय देशमुख यांना दिले.राष्टÑवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष अशोक शहारे यांच्या नेतृत्वात निवेदन देताना नगरसेवक विनीत सहारे, शहर उपाध्यक्ष नानू मुदलीयार, हेमंत पंधरे, बंटी पंचबुद्धे, मनोहर वालदे, रमन उके, योगेश बनकर, दीपक कनोजे आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी शहरातील गश्त वाढविण्याची तसेच असामाजिक तत्वावर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
वाढत्या गुन्हेगारीवर आळा घाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 23:57 IST
शहरात गुन्हेगारी, चोरी, वाटमारी आदी घटनात दिवसेंदिवस वाढतच आहे. यावर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी संपात व्यक्त केला असून वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवर तत्काळ आळा घालून ठोस पाऊल उचलण्यात यावे, .....
वाढत्या गुन्हेगारीवर आळा घाला
ठळक मुद्देराष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष : शिष्टमंडळाने दिले पोलीस अधीक्षकांना निवेदन