शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

पुलासाठी ग्रामस्थांचा रास्ता रोको

By admin | Updated: February 13, 2016 01:13 IST

विहीरगाव-बुराड्या ते भुगाव-मेंढा दरम्यानच्या चुलबंद नदीवर चार वर्षापुर्वी पूलाचे बांधकाम पूर्ण झाले.

व्यथा विहीरगाव-भूगाव मार्गाची : जिल्हा परिषद अध्यक्षांची आंदोलनात हजेरीसानगडी : विहीरगाव-बुराड्या ते भुगाव-मेंढा दरम्यानच्या चुलबंद नदीवर चार वर्षापुर्वी पूलाचे बांधकाम पूर्ण झाले. पूलाच्या दोन्ही बाजूला शेती आहे. संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या संबंधाने समाधानकारक मोबदल्याची शासनाची भूमिका न दिल्याने सदर शेती पोच मार्गासाठी अधिग्रहीत झाली नाही. चार वर्षांपूर्वी तयार झालेला पूल पोच मार्गाविना असल्याने शोभेची वास्तू म्हणून उभी आहे. संतप्त झालेल्या नागरिकांनी आज रास्ता रोको आंदोलन केले.दोन्ही तिरावर पोच मार्ग तयार न झाल्याने ऐलतिरावरून पैलतिरावर पायी अथवा वाहनाने पूलावरून परिसरातील नागरिकांना आवागमन करता येत नाही. भुगाव-मेंढा, विहीरगाव, कोलारी, मुरमाडी आदी गावातील नागरिकांनी कित्येकदा पोचमार्ग तयार करण्यासाठी संबंधित अधिकारी, आमदार, खासदार यांना प्रत्यक्षात निवेदन दिले. तब्बल चार वर्षाचा कालावधी लोटला पण याबाबत काहीच कार्यवाही झाली नाही. परिणामी परिसरातील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करून रास्ता रोको आंदोलन केले.सध्या ऐलतिरावरून पैलतिरावरील गावाकडे जाण्यासाठी पूल तयार आहे. पण पुलापर्यंत जाण्यासाठी पोच मार्ग नाही. तात्पुरती हंगामी सोय म्हणून नदीतून कच्चा रपटा मार्ग तयार करून आवागमन करावे लागत आहे. या मार्गावरील विहीरगाव बुराड्या गोपालपूरी म्हणून तर भुगाव मेंढा विदर्भातील पंढरपूर म्हणून प्रसिद्ध आहेत. दरवर्षी भुगाव, पंढरपुरला भव्यदिव्य संत सोहळा भरत असून लाखो लोकांची उपस्थिती असते. हा मार्ग सानगडी-विहीरगाव, भुगाव-मुरमाडी, पिंपळगाव-लाखनी-भंडारा असा जोडलेला आहे.या मार्गावरील नागरिकांचे भविष्यातील सोई सुविधा विचारात घेवून तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या प्रयत्नाने चुलबंद नदीवरील पुलाचे बांधकाम झाले. त्यानंतर निवडणुका झाल्या. सत्ता परिवर्तन झाले. पूर्वसत्तेतील पुलासंबंधीच्या उर्वरित कामाला पूर्णत्व देण्यासाठी सध्याचे सत्तेमधील सरकार अपयशी ठरत आहे. परिणामी परिसरातील जनता स्वहिताचा लढा लढण्यासाठी रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलनास प्रवृत्त झाले.या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश ब्राम्हणकर, जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, जिल्हा परिषद सदस्य रेखा वासनिक, विहीरगावचे सरपंच हरीभाऊ बनकर, भुगावचे सरपंच दुधराम बारस्कर, तंमुस अध्यक्ष श्रीराम राऊत, तंमुस अध्यक्ष मनोहर ईटवले, अशोक शहारे, आनंदराव बारस्कर, बाळकृष्ण सावरकर, दुर्याेधन बारस्कर, हंसराज बारस्कर, तेजराम कोचे, मनोहर नगरकर, सुभाष सावकर, मुरली बनकर, उपसरपंच माया चौबे, वैशाली सिंदीमेश्राम, वासुदेव सिंदीमेश्राम, प्रभू खंडाळकर, भुगाव व विहीरगाव येथील ग्रामपंचायत सदस्यगण व परिसरातील बहुसंख्य नागरिकांनी नेतृत्व केले.आंदोलनाला साकोली येथील नायब तहसीलदार खोत, लाखनी येथील नायब तहसीलदार मारवाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता राऊत यांनी भेट देवून एक ते दीड महिन्यात पावसाळ्यापूर्वी या पोचमार्गाचे बांधकाम पूर्ण करू, असे आश्वासन दिले. यावेळी शांतता, सुव्यवस्था राखण्यासाठी घटनास्थळी पालांदूरचे सहायक पोलीस निरीक्षक एच.एम. सय्यद व साकोलीचे पोलीस निरीक्षक घुसर यांचे सहकारी उपस्थित होते. (वार्ताहर)