शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेसचे विस्तारीकरण थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 05:00 IST

गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील नागरिकांना या गाडीचा लाभ मिळत असून, ती जीवनदायिनी म्हणून ओळखली जाते. या गाडीच्या माध्यमातून गोंदिया, भंडारा, बालाघाट आदी जिल्ह्यांतील हजारो प्रवासी प्रवास करतात व गाडीतून दूध, फळ-भाजी, औषधे, कुरियर-डाकसेवा व असंख्य जीवनोपयोगी वस्तू व गरजांची पूर्तता होते.  गोंदिया, तिरोडा, तुमसर, भंडारा, कामठी-कन्हान, नागपूर व अन्य शहरांमध्ये काम करणारे स्थानिक नागरिकांकरिता ही ट्रेन एक प्रकारे वरदान आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नगरपरिषद अध्यक्ष अशोक इंगळे यांनी मुंबई दौऱ्यादरम्यान महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. याप्रसंगी झालेल्या चर्चेत गोंदिया शहरात झालेल्या व नियोजित विकासकामांबाबत चर्चा केली, तसेच गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेसचे विस्तारीकरण थांबविण्याची मागणी करीत त्यांना निवेदन दिले. उल्लेखनीय आहे की, गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेसचा विस्तार रीवा (मध्य प्रदेश)पर्यंत करण्याचा प्रस्ताव सेंट्रल रेल्वेद्वारारेल्वे विभागाला पाठविण्यात आलेला आहे. या प्रस्तावाची माहिती गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील नागरिकांना मिळताच, याबाबत तीव्र रोष व्यक्त केला आहे. गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील नागरिकांना या गाडीचा लाभ मिळत असून, ती जीवनदायिनी म्हणून ओळखली जाते. या गाडीच्या माध्यमातून गोंदिया, भंडारा, बालाघाट आदी जिल्ह्यांतील हजारो प्रवासी प्रवास करतात व गाडीतून दूध, फळ-भाजी, औषधे, कुरियर-डाकसेवा व असंख्य जीवनोपयोगी वस्तू व गरजांची पूर्तता होते. गोंदिया, तिरोडा, तुमसर, भंडारा, कामठी-कन्हान, नागपूर व अन्य शहरांमध्ये काम करणारे स्थानिक नागरिकांकरिता ही ट्रेन एक प्रकारे वरदान आहे. त्यामुळे गाडीची वेळ पूर्वीप्रमाणेच करावी व गाडीतील सर्व डबे गोंदिया-नागपूर व नागपूर-गोंदिया दरम्यान पूर्ववतच सामान्य दर्जाचेच ठेवण्यात यावे, अशी मागणीही इंगळे यांनी निवेदनातून केली आहे. यावर, केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना तत्काळ कार्यवाहीकरिता प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे महामहिम राज्यपालांनी इंगळे यांना आश्वस्त केले.

टॅग्स :railwayरेल्वे