शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

कोर्टाच्या आदेशापर्यंत निवडणूक प्रक्रिया थांबवा

By admin | Updated: June 23, 2017 01:13 IST

ग्रामपंचायत आमगाव खुर्दला सालेकसा नगर पंचायतमध्ये समाविष्ट करावे की नाही याबाबतचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या...

ग्रा.पं. आमगावखूर्दचे तहसीलदारांना निवेदन : बहिष्कार घालण्याचा प्रस्ताव पारितलोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : ग्रामपंचायत आमगाव खुर्दला सालेकसा नगर पंचायतमध्ये समाविष्ट करावे की नाही याबाबतचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंड पिठात प्रलंबित असून उच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत आमगाव खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीची कोणतीही प्रक्रिया करण्यात येऊ नये अशा आशयाचे प्रस्ताव ग्रामपंचायत आमगाव खुर्द ने पारित करुन तसे निवेदन सालेकसाचे निवडणूक अधिकारी व तहसीलदार प्रशांत सांगळे यांना सादर करण्यात आले आहे.अडीच वर्षांपूर्वी सालेकसा ग्रामपंचायतला नगर पंचायत घोषित करण्यात आले. परंतु आमगाव खुर्द सुद्धा सालेकसाचा एक महत्वपूर्ण भाग असून दोन्ही ग्रामपंचायती मिळून एक सालेकसा नगर पंचायत बनविण्यात यावी जेणेकरुन येथील सालेकसा नगराला व नगरवासीयांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा सालेकसा नगरवासी करीत आहेत. परंतु मुळात सालेकसा नगर हे आमगाव खुर्द ग्रामपंचायतमध्ये मोडत असल्याने मोठी तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. ही बाब शासनातील आणि प्रशासनातील वर बसलेल्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांना सहज कळत नाही असे दिसत आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीचा तिढा कायम आहे. मागील वर्षी राज्यात सर्वत्र नवनिर्मित नगर पंचायतीच्या निवडणुका लागल्या. तेव्हा सालेकसानगर पंचायतची सुद्धा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. परंतु लगेच आमगाव खुर्द वासीयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली व नगर पंचायत निवडणुकीवर स्थगिती आणत आमगाव खुर्दला समाविष्ट करण्याची मागणी केली. मागील दीड वर्षापासून प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. तर दुसरीकडे येत्या काही महिन्यात राज्यात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असून त्यासाठी प्रभाग रचना व प्रभाग आरक्षण प्रक्रिया सुरू झालेली आहे. अशात शासनाच्या आदेशाप्रमाणे व निवडणूक आयोगाच्या निर्देशनुसार स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांनी आमगाव खुर्द ग्रामपंचायतमध्ये सुद्धा प्रभाग रचना आणि आरक्षणाचा कार्यक्रम सुरू केला आहे. यावर आमगाव खुर्द ग्रामपंचायतच्या कमिटीने एकमताने या निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार घालण्याचा प्रस्ताव पारीत केला आहे. तसेच सालेकसाचे तहसीलदार व नगर पंचायत प्रशासक आणि निवडणूक अधिकारी सांगळे यांना निवेदन सादर करीत निवडणूक प्रक्रिया थांबविण्याची मागणी केली. त्या मार्फत शासनाला निवेदन करीत न्यायालयाच्या आदेशापर्यंत जैसे थे परिस्थिती राहू द्यावी असा आग्रह केला. निवेदन देणाऱ्यांमध्ये सरपंच योगेश राऊत, उपसरपंच हरजीत कौर भाटीया, सदस्य ब्रजभूषण बैस, अजय डोये, संदीप डेकाटे, वासुदेव चुटे, कुलतारसिंह भाटीया, सुरेश प्रजापती, हर्षलात शर्मा, रमेश फुंडे, प्रेमलता बन्सोड, दिलीप तिवारी, धनंजय बंडीवार, महेश खोकले, विनय शर्मा, विजय फुंडे, अनिल शेंदरे, शशी फुंडे, सुरेश दोनोडे, अभिषेक चुटे, भिमराव भास्कर, मोनालिषा ब्राम्हणकर, सुजित बन्सोड यांच्यासह इतर नगरवासी उपस्थित होते.