शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम कार्ड चोरून पैसे काढणाऱ्यास पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 20:52 IST

एटीएम कार्ड चोरून त्याद्वारे संबंधिताच्या बँक खात्यातून पैसे काढणाºया आरोपीस पोलिसांनी मोठ्या शिताफीने शनिवारी (दि.२०) दुपारी १२.३० वाजतादरम्यान पकडले.

ठळक मुद्देतिरोडा पोलिसांची कारवाई : तिरोडा, तुमसर, भंडारा व गोंदियातही काढले पैसे

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : एटीएम कार्ड चोरून त्याद्वारे संबंधिताच्या बँक खात्यातून पैसे काढणाºया आरोपीस पोलिसांनी मोठ्या शिताफीने शनिवारी (दि.२०) दुपारी १२.३० वाजतादरम्यान पकडले.विशेष म्हणजे, या तरूणाने तिरोडासह गोंदिया, भंडारा व तुमसर येथेही अशाच प्रकारे लोकांच्या खात्यातून पैसे काढल्याची कबूली दिली आहे. सविस्तर असे की, निलम भुपेंद्र पटले (२३,रा.चिखली) या ७ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजतादरम्यान देना बँकेतील एटीएममध्ये पैसे काढत होत्या. त्यांनी तीन हजार रूपये काढले व काऊंटरवर पैसे मोजत असताना त्यांचे एटीएम कार्ड चोरून नेले होते. त्यानंतर सदर इसमाने विविध एटीएम मधून निलम पटले यांच्या खात्यातून १७ हजार रूपये काढले.प्रकरणी तिरोडा पोलिसांनी १० आॅक्टोबर रोजी भादंवीच्या कलम ३७९ अंतर्गत गुन्हा नोंद केला होता. प्रकरणाचा तपास करताना ठाणेदार संदीप कोळी व पथकाने सिसिटिव्ही फुटेजवरून आरोपीने या गुन्ह्यात वापरलेली होंडा हॉरनेट दुचाकी व आरोपीचा फोटो काढण्यात यश मिळविले.त्यानुसार तपास करीत असताना शनिवारी (दि.२०) दुपारी १२.३० वाजतादरम्यान एक इसम हॉरनेट दुचाकीने भरधाव वेगात तिरोडा शहराकडे जात असताना दिसला. यावर ठाणेदार कोळी यांनी पथकासह पाठलाग करून त्याला पकडले.इसमाने आपले नाव पवन राजेंद्र कुंडभरे (रा.मोतीनगर वॉर्ड क्रमांक १७, बालाघाट,मप्र.) सांगीतले. तसेच त्याने केलेल्या गुन्ह्याची कबूली दिली.विशेष म्हणजे, या आरोपीने तिरोडासह गोंदिया, भंडार व तुमसर येथेही अशाप्रकारे पैसे काढल्याचा गुन्हा केला असल्याची कबूली दिली असून त्यानुसार तपास सुरू आहे.

टॅग्स :atmएटीएमThiefचोर