शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

नगर परिषदेच्या निविदांवर ‘स्टे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 00:06 IST

शहरातील विविध कामांसाठी नगर परिषदेने काढलेली निविदा पुन्हा वांद्यात आली असून कंत्राटदाराच्या जनहित याचीकेवरून नागपूर उच्च न्यायालयाने निविदांवर ‘स्टे’ दिला आहे. याप्रकारामुळे नगर परिषद वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देनिविदा प्रकिया दुसऱ्यांदा वांद्यात : कंत्राटदारांचा अटी-शर्तींवर आक्षेप

आॅनलाईन लोकमतगोंदिया : शहरातील विविध कामांसाठी नगर परिषदेने काढलेली निविदा पुन्हा वांद्यात आली असून कंत्राटदाराच्या जनहित याचीकेवरून नागपूर उच्च न्यायालयाने निविदांवर ‘स्टे’ दिला आहे. याप्रकारामुळे नगर परिषद वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.नगर परिषदेने विविध योजनांतर्गत शहरातील विविध कामांसाठी यापूर्वीही सुमारे १७ कोटींच्या ७३ कामांसाठी निविदा काढली होती. या निविदांत नगर परिषदेकडून कित्येकदा तारीख वाढविण्यात आली होती. तसेच त्यातील काही अटी-शर्ती निवडक कंत्राटदारांच्या सवलतीने टाकण्यात आल्याचे नगर परिषदेतील कंत्राटदारच बोलत होते.या निविदांना १५ जानेवारी रोजी बोलाविण्यात आलेल्या विशेष सभेत मंजुरी दिली जाणार होती. मात्र काही कंत्राटदारांनी न्यायालयात धाव घेतली होती. परिणामी न्यायालयातून निविदांना घेऊन कार्यारंभ आदेश देता येणार नसल्याचे आदेश देण्यात आले होते. यावर नगर परिषदेने तडकाफडकी निविदा रद्द केल्या होत्या. नगर परिषदेतील निविदांचा हा घोळ चांगलाच गाजला होता. दरम्यान आता पुन्हा १ फेब्रुवारी रोजी नगर परिषदेने निविदा काढली.यातही काही निवडक कंत्राटदारांनाच कामे मिळावी या उद्देशातून अटी-शर्ती टाकण्यात आल्याचे कंत्राटदार बोलत होते. त्यामुळे नगर परिषदेत पुन्हा एकदा निविदांचे प्रकरण गाजत होते. अशात एका कंत्राटदाराने पुन्हा नागपूर उच्च न्यायालयात धाव घेतली. यावर न्यायालयाने निविदा प्रक्रीया सुरू राहू द्या, मात्र कार्यारंभ आदेश देता येणार नसल्याचे आदेश दिल्याची माहिती आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या निविदा पुन्हा एकदा वांद्यात आल्या आहेत.कंत्राटदारांचे काय आहेत आक्षेपयंदा काढण्यात आलेल्या निविदांत काही कामे कमी-जास्त करण्यात आली असून अटी-शर्तींतही बदल झाला आहे. अशात ही निविदा नवीन असून यासाठी ९ ऐवजी २१ दिवसांचा कालावधी द्यावा. आरएमसी प्लांटची अट काही निवडक कंत्राटदारांना कामे मिळावी यासाठी टाकण्यात आल्याचेही कंत्राटदारांचे म्हणणे असून यासह अन्य अटी-शर्तींवर कंत्राटदारांना आक्षेप असल्याची माहिती आहे. यातूनच एका कंत्राटदाराने न्यायालयात धाव घेतली.न्यायालयाने निविदांना घेऊन दिलेले आदेश मान्य असून त्यानुसारच कारवाई केली जाईल.- चंदन पाटीलमुख्याधिकारी, नगर परिषद, गोंदिया