शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

एचआरसीटी सीटी स्कॅनकरिता राज्यभरात एकच दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 22:26 IST

एचआरसीटी सीटी स्कॅनकरिता रुग्णांना अतिरिक्त भुर्दंड बसू नये यासाठी राज्यभरासाठी आता २५०० रुपये दर निश्चित केले आहे. यापेक्षा अधिक दर आकारता येणार नाही नसल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज (दि.२४) गोंदिया येथे सांगितले.

ठळक मुद्देअतिरिक्त दर आकारण्यावर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : एचआरसीटी सीटी स्कॅन करिता पूर्वी खासगी रूग्णालयात ६५०० रुपयांपेक्षा अधिक आकारले जात होते. कोविडमुळे एचआरसीटी सीटी स्कॅन करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे एचआरसीटी सीटी स्कॅनकरिता रुग्णांना अतिरिक्त भुर्दंड बसू नये यासाठी राज्यभरासाठी आता २५०० रुपये दर निश्चित केले आहे. यापेक्षा अधिक दर आकारता येणार नाही नसल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज (दि.२४) गोंदिया येथे सांगितले.एचआरसीटी सीटी स्कॅन करिता राज्यभरात आता एकच दर असणार असून याची अंमलबजावनी शुक्रवारपासून सर्वत्र करण्यात येणार आहे. यासंबंधिचे परिपत्रक गुरूवारीच आरोग्य विभागाच्या संकेत स्थळावर अपलोड करण्यात आले आहे. या निर्णयामुळे आता एचआरसीटी सीटी स्कॅनकरिता २५०० रुपयांपेक्षा अधिक दर खासगी रुग्णालयांना आकारता येणार आहे. काही ट्रस्ट रुग्णालयात याचे दर यापेक्षा कमी असेल तर त्यांना सुध्दा यात वाढ करता येणार नाही. यापेक्षा अधिक दर घेणाऱ्या रुग्णालयांवर नियमानुसार कारवाई केली जाईल.

या निर्णयामुळे सीटी स्कॅन करणाऱ्या रुग्णांना निश्चितच दिलासा मिळाणार आहे. तसेच याची कठोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना सुध्दा सर्व खासगी रुग्णालयाला देण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री टोपे यांनी सांगितले. तसेच प्लाज्मा थेरपीकरिता अतिरिक्त दर आकारले जात आहे. त्यामुळे याला सुध्दा आता प्रतिबंध लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी त्यांच्यासोबत गृहमंत्री अनिल देशमुख, खा. प्रफुल्ल पटेल, माजी आ.राजेंद्र जैन उपस्थित होते.

ऑक्सिजनचा काळाबाजार रोखणारगोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला नागपूर येथील रुक्मीनी ऑक्सिजन प्लान्टमधून ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. मात्र येथून अनियमित पुरवठा केला जात असल्याने अडचण होते. त्यामुळे नागपूर रुक्मीनी ऑक्सिजन प्लान्टच्या संचालकाला शुक्रवारी बोलावून आवश्यक सूचना करण्यात येणार आहे. तसेच ऑक्सिजनचा काळाबाजार होणार नाही याची सुध्दा काळजी घेण्याचे निर्देश देण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्यRajesh Topeराजेश टोपे