शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
3
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
4
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
5
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
6
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
7
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
8
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
9
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
10
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
11
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
12
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
13
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
14
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
15
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
16
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
17
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
18
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
19
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
20
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!

रस्त्याचे काम त्वरित सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 23:58 IST

शहरातील प्रभाग क्र.१ मधील कुडवा नाका ते वसंत लिथो प्रेस चौक मार्गाची अंत्यत दुर्दशा झाली आहे. तसेच हा रस्ता अरुंद असल्याने अनेकदा या मार्गावर वाहतुकीची कोंडी होती. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांना प्रंचड त्रास सहन करावा लागत असून अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा : कुडवा ते वसंत लिथो प्रेस चौक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील प्रभाग क्र.१ मधील कुडवा नाका ते वसंत लिथो प्रेस चौक मार्गाची अंत्यत दुर्दशा झाली आहे. तसेच हा रस्ता अरुंद असल्याने अनेकदा या मार्गावर वाहतुकीची कोंडी होती. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांना प्रंचड त्रास सहन करावा लागत असून अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गाची त्वरीत दुरूस्ती करण्यात यावी, अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे.कुडवा नाका ते वसंत लिथो प्रेस चौकापर्यंत रस्त्या रुंदीकरण व डांबरीकरण व नाली बांधकामाला शासनाने २०१७ पासून मंजुरी दिली आहे. तसेच याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना विचारणा केली असता त्यांनी काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही रस्त्याचे काम सुरू करण्यात आले नाही. परिणामी विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय होत आहे. तिरोडा तुमसर व गोंदिया ग्रामीण भागाकडे जाण्यासाठी याच रस्त्याचा सर्वाधिक वापर होतो.या मार्गावर शाळा व महाविद्यालय असल्याने विद्यार्थ्यांची सुध्दा ये-जा सुरू असते. मात्र हा रस्ता अरुंद आणि ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने या मार्गावरुन ये-जा करणाºयांसाठी त्रासदायक ठरत आहे. रस्त्याची दुरावस्था झाल्याने मागील काही दिवसांपासून या मार्गावर अपघातांच्या संख्येत सुध्दा वाढ झाली आहे.शासनाने या मार्गाची दुरूस्ती व रुंदीकरणाला मंजुरी दिली असताना सुध्दा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे शहरवासीयांमध्ये रोष व्याप्त आहे.त्यामुळे संबंधित विभागाने या रस्त्याचे काम त्वरीत सुरू न केल्यास रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा राष्टÑवादी काँग्रेसने दिला आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस